Saturday, December 20, 2025
Home Blog Page 772

सांगलीचा निकाल विशाल पाटील यांच्या बाजूने? कसं ते पाहुयात

vishal patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगलीतील तीन पाटलांच्या मतदानाची कुस्ती पार पडली…निकाल ईव्हीएम मशीन मध्ये बंद झालाय. विशाल पाटलांचं तिकीट कापल्यानं सांगलीची जागा चर्चेत आली होती. नो मशाल ओन्ली विशालच्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. मतदानानंतर आता बरचसं चित्र क्लिअर होऊ लागलंय. आणि सांगलीत विशाल पाटलांनी मशाल विझवलीय. असं लोकं सरसकट बोलू लागलेत. यंदा महाराष्ट्रातून अपक्ष खासदार म्हणून विशाल पाटील (Vishal Patil) हे नाव दिल्लीत सांगलीचा आवाज बनेल. महाविकास आघाडीचं पारडं जड असतानाही विशाल पाटील भारी पडून शिवसेनेची मशाल का विझली? विशाल पाटलांना कुठल्या विधानसभा मतदारसंघातून कसं लीड मिळालंय? हेच कट टू कट सांगतोय, हेच जाणून घेऊयात …

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सांगलीची जागा प्रतिष्ठेची बनेल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. दोन टर्म भाजपच्या संजय काका पाटलांनी दिल्ली वारी केल्यावर काँग्रेसचा हा बालेकिल्ला विशाल पाटलांना खासदार बनवण्यासाठी मनानं आणि मतानं तयार होता. पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिठाचा खडा पडला. आणि सांगलीचा तिढा वाढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा फॉर्मुला समोर येत उद्धव ठाकरेंनी तिकीट वाटपाच्या आधीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या विशाल पाटलांनी विश्वजीत कदमांच्या मदतीने तिकिटासाठी ताकद लावली. पण त्याला यश काही आलं नाही. अखेर विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून फॉर्म भरला. निवडणूक चिन्ह मिळालं लिफाफा…

मतदानाच्या दिवशी लढत तीन पाटलांच्यात होती. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून विशाल पाटील. पण सांगलीत खरी लढत दोघांच्यातच झाली एक म्हणजे विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील… ठाकरे गटाची जिल्ह्यातील असणारी कमकुवत ताकद, विश्वजीत कदमांचा मदतीचा छुपा हात आणि विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची भावना हे सगळे फॅक्टर निर्णायक ठरले आणि चंद्रहार पाटील निवडणुकीआधीच साईडलाईन झाले. त्यामुळे कमळ विरुद्ध लिफाफा असंच वातावरण मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळालं. पण या लढतीतही अखेर विशाल पाटीलच सरशी मारताना दिसतायत…

सांगलीच्या मतदानाची सुरुवात झाली ती विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या एका फोटोने…मतदान केंद्रावरती मतदान झाल्यानंतर दोघांनी एकत्रित फोटो शेअर केला आणि सांगलीला नवा मेसेज दिला. विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं म्हणजेच चंद्रहार पाटलांचं काम करणार असं सांगत असले तरी त्यांनी काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकद आतून विशाल कदमांच्या पाठीशी लावली होती. मतदानाच्या दिवशीही हे अनेक प्रसंगातून आढळून आलं. दादा पाटील घराण्याच्या समर्थक कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांसाठी जीव तोडून प्रचार केला होता. भरीस भर म्हणजे वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा देऊन मोठा डाव साधला. सुजात आंबेडकरांपासून वंचितची संपूर्ण यंत्रणा प्रचारात विशाल पाटलांच्या पाठीशी होती. त्याचंच प्रतिबिंब मतदानाच्या दिवशीही प्रत्येक बुथवर पाहायला मिळालं. मराठा, दलित, मुस्लिम आणि संजय काकांच्या दोन टर्मच्या कारकिर्दीला कंटाळलेलं मतदारांचं मतही विशाल पाटलांच्या पाठीशीच राहिलं. त्यामुळे यंदा विशाल पाटलांची दिल्ली वारी फिक्स समजली जातेय.

विधानसभा मतदारसंघनिहाय झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरही नजर टाकली तर हे स्पष्ट होतं की विशाल पाटलांचं पारडं जड झालंय. पलूस कडेगाव आणि मिरजेमधून विशाल पाटलांना मिळणारं लीड तासगाव मधून संजय काका पाटलांना तोडताना दमछाक झालेली दिसते. त्यामुळे एकट्या हिंदुत्वाच्या मतांच्या आधारावर संजय काका पाटील सांगलीची खिंड लढवताना दिसले. पण विशाल पाटलांच्या पाठीशी असणारी सहानुभूतीची लाट ही सांगलीत निर्णायक ठरणारय, असंच सध्या चित्र दिसतंय.

थोडक्यात सांगायचं झालं तर विशाल पाटलांना हलक्यात घेणं महाविकास आघाडीला जड गेलेलं दिसतंय. सांगलीच्या जागेचा हट्ट करून आपला निर्णय चुकला, याचा ठाकरे गटाला येत्या 4 जूनला नक्कीच पश्चाताप होईल. असं वातावरण निवडणुकीनंतर सध्या तरी सांगलीत पाहायला मिळतय. त्यामुळे येनवेळी उमेदवारी जाहीर करून दादा पाटील घराण्याच्या राजकारणावर तुळशीपात्र ठेवण्याचा डाव विशाल पाटलांनी हाणून पाडला. याउलट भाजपच्या कट्टर हिंदुत्ववादी विद्यमान खासदाराला शह देत, शिवसेनेची मशाल विझवत विशाल पाटील हे सांगलीत गेम चेंजर ठरलेत. या सगळ्यात आपल्या काँग्रेसची असण्याचा आणि पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा हवाला देत, काँग्रेस वरिष्ठांचीही गोची केली. थोडक्यात चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नो मशाल ओन्ली विशाल चा नारा विशाल पाटील समर्थकांनी अखेर खरा करून दाखवलाय, असं बोलायला स्कोप उरतो. हे सगळं पाहता सांगलीत खरंच मशाल विझून विशाल पाटील यांच्या सहानुभूतीचा लिफाफा चालणार का? आणि जर हेच चित्रं असेल तर विशाल पाटलांच्या विजयाचं मार्जिन नेमकं किती असेल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

नाहीतर गाठ माझ्याशी, एकनाथ शिंदेंकडून खासदार हेमंत गोडसे यांची कानउघडणी

hemant godase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात सोडून बसले होते. आठवड्यांमागून आठवडे उलटत गेले तरी नाशिकचा तिढा काही सुटता सुटेना. अखेर छगन भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली. आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचं काळीज हलकं झालं. नाशिक मधूनच ते पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असणार आहेत. पण उमेदवारीसाठी गोडसेंना करावी लागणारी उरफोड तिकीट मिळाल्यानंतरही काही कमी होताना दिसत नाहीये. हेमंत गोडसेंचं काही केल्या काम करणार नाही, असा स्टॅन्ड भाजपच्या आमदारांनी घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांची फोर्सही गोडसेंच्या उमेदवारीवर नाक मुरडून आहे.

या सगळ्यामुळे झालंय असं की, नाशकात राजाभाऊ वाजे यांची मशाल पेटणारच! असा सूर सर्वच पातळीवर उमटू लागल्यानं आता मुख्यमंत्री शिंदेंनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतलीयेत. हेमंत गोडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतानाच त्यांनी गोडसेंनाच दमदाटीची भाषा वापरलीय. एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा अनेक चढ उतार पाहायला मिळणाऱ्या नाशकात मशाल एक्सट्रा एफर्ट न घेता आघाडीवर कशी आहे? विजय करंजकर, शांतिगिरी महाराज, अनिल जाधव यांनी हेमंत गोडासेंना दिवसाढवळ्या चांदण्या कशा दाखवल्यात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना दमदाटी करावी लागण्याइतपत हेमंत गोडसे यांनी केलंय तरी काय? या सगळ्याचाच पोस्टमार्टम जाणून घेऊयात ..

तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला सुरुवात केली जाईल, असं बोललं गेलं. प्रत्यक्षात मात्र गोडसेंच्या प्रचाराला महायुतीतील नेतेमंडळी सध्या तरी फारसे इच्छुक नसल्याचं पाहायला मिळतंय. हे सगळं पाहता शेवटी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंना नाशिकची वाट धरावी लागली. त्यांनी नाशिकात मेळावा घेतला. जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवाय हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा शब्दही दिला. पण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली. महायुतीचे तिन्ही घटक पक्ष गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर पांगलेले आहेत. त्यांच्या उमेदवारीवर भाजप, राष्ट्रवादी आणि स्वतः शिवसेना पक्षातूनही मोठा विरोध होतोय. हा सगळा सावळा गोंधळ पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी गोडसेंवरच जाळ अन धूर काढला…

गोडसेंना उमेदवारी देऊ नका असे मला सर्वच जण सांगत होते. पण, शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही असे मी ठरवले. कार्यकर्ता हाच खासदार, आमदार बनवत असतो. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणींत धावून जा, त्यांना आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला, कॉल डायव्हर्ट करू नका, पोलिस ठाणे, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या, की मला विनंती करावी लागते… अशा तिखट शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच उमेदवाराच्या प्रचारात कान टोचलेत. आमदार, नगसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका, नाहीतर माझ्याशी गाठ असल्याचा अप्रत्यक्ष दमच शिंदेंनी गोडसेंना भरला. त्यामुळे उमेदवारी घेऊन आपण चूक तर केली नाही ना? असा प्रश्न या सगळ्या प्रकारावर हेमंत गोडसेंना पडला असावा.

महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तर उघडपणे गोडसे यांची निष्क्रिय खासदार म्हणून हेमंत गोडसेंना टोमणा मारला होता. भुजबळ, कोकाटे अशा नाराजवंतांची फौज, शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी हे सगळं हेमंत गोडसे यांच्या विरोधात जाताना दिसतय. आपल्या खासदारकीच्या काळात सर्वपक्षीय नेत्यांशी फटकून वागण्याची मोठी किंमत आता त्यांना चुकती करावी लागतेय. पण यामुळे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होतोय. सगळं निगेटिव्ह मध्ये जाणार वातावरण पाहता नाशकात मशाल पेटून हेमंत गोडसे हे लोकसभेच्या मैदानात जोरदार आपटतील, असं म्हणायला फुल टू स्कोप आहे. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Mumbai News : महत्वाची बातमी ! आजपासून मध्य रेल्वेवर ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही परिणाम

mumbai news

Mumbai News : मुंबईत रेल्वे म्हणजे मुंबईची लाईफलाईन. वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून सुद्धा अनेकजण मुंबईत रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही जर आज दिनांक १० आणि ११ मे रोजी मध्य रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबई – CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक (Mumbai News) घेण्याच येणार आहे.

यादरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत. शनिवारीही लोकल सेवेवर परिणाम दिसणार असून, रात्री 12.30 नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी (Mumbai News) दरम्यानची रेल्वेसेवा पहाटे 4.30 वाजेपर्यत बंद राहणार आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम (Mumbai News)

मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार असून या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 12502 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, 22120 मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, 12810 हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकांपर्यतच चालविण्यात येतील. तर, सीएसएमटी स्थानकातून कल्याणच्या दिशेनं रात्री 9 वाजून 54 मिनिटांनी सुटणारी लोकल (Mumbai News) आणि कल्याण स्थानकातून CSMT साठी सुटणारी 11.05 ची लोकल रद्द असेल.

लोकलच्या वेळांवर परिणाम (Mumbai News)

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरही अशीच काहीशी परिस्थिती असेल. चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या उत्तरेकडील मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांपासून पहाटे 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यामुळं काही लोकलच्या वेळांवर परिणाम होणार आहे. या ब्लॉक काळाच मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान काही लोकल रद्द (Mumbai News) केल्या जातील.

पश्चिम रेल्वे मार्ग

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री साडेअकरा वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री 1.10 वाजता पोहोचेल. या प्रवासासाठी धावणारी ही शेवटची लोकल असेल. विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री 11.49 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल तर, विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री 12.05 वाजता सुटून मुंबई सेंट्रलपर्यंत (Mumbai News) धावेल.

तर, बोरिवली-चर्चगेट लोकल बोरिवलीहून रात्री 12.30 वाजता निघून मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. चर्चगेट-विरार लोकल, चर्चगेटहून पहाटे 4.15 वाजता सुटणारी लोकल मुंबई सेंट्रलवरून दहा मिनिटं उशिरानं म्हणजेच पहाटे 4.25 वाजता सुटेल. चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटहून 10 मिनिटं उशिरानं, अर्थात 4.28 वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं (Mumbai News) दिली आहे

Viral Video : भारीच!! परदेशात पोहोचली आपली लाडाची रिक्षा; कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरतेय ऐटीत

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारत देश हा विविधतेने नटलेला असल्यामुळे परदेशीयांना कायम आपल्या देशाचे आकर्षण वाटते. आपल्या देशातील ऐतिहासिक वास्तू, खाद्य संस्कृती, दळणवळणाची साधने अशा बऱ्याच गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी हे लोक भारतात येत असतात. आपल्या देशातील अनेक भागांमध्ये वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहनांचा वापर केला जातो. जसे की, लोकल ट्रेन, बस, मेट्रो, मोनो, टॅक्सी. ही सर्व वाहने परदेशात देखील आहेत. मात्र, भारतातील सर्वात लोकप्रिय वाहन असणारी तीनचाकी रिक्षा परदेशात पहायला मिळत नाही. पण आता, चक्क अमेरिकेत रिक्षा पहायला मिळतेय. होय. तसा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

अमेरिकेतील अत्यंत प्रसिद्ध शहर कॅलिफोर्नियामध्ये चक्क ऑटोरिक्षाचे दर्शन झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर एक ऑटोरिक्षा मोठ्या थाटात आणि सगळ्यांचे लक्ष वेधत फिरताना दिसतेय. सोशल मीडियावर या रिक्षाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर फिरणारं काळ्या आणि पिवळ्या रंगातील हे वाहन आपली लाडकी रिक्षा आहे, हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर स्वच्छ रस्ते आणि त्यावरून ऐटीत जाणारी रिक्षा खरोखरच कमाल वाटतेय.



सोशल मीडिया इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ manoharsrawat नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘कॅलिफोर्नियात ऑटोरिक्षा #artesia.’ व्हिडिओत दिसणारी रिक्षा अगदी भारतातील रस्त्यांवर फिरणाऱ्या रिक्षांसारखी आहे. (Viral Video)त्यामुळे खरोखरच हे दृश्य भारतीयांसाठी विशेष ठरत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. आजपर्यंत परदेशात केवळ भारतीय संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचे आकर्षक प्रकर्षाने पाहिले होते. मात्र, आता रिक्षाबाबत असलेलं आकर्षण पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘वाह! मुंबईची रिक्षा थेट अमेरिकेला पोचली..’. तर आणखी एकाने म्हटलंय, ‘वाह! आता अमेरिका भारतासारखी बनू लागली आहे’. तर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय, ‘या रिक्षाला परवानगी कशी मिळाली?’ दरम्यान कमेंट बॉक्स पाहून लक्षात येते की, कॅलिफोर्नियात रिक्षा पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. हा (Viral Video) व्हिडीओ ट्रेंडिंग व्हिडिओंपैकी एक असून आतापर्यंत याला ९८३K इतके व्ह्युज आणि २६.५K लाइक्स मिळाले आहेत.

IRCTC : ‘प्रिमिअम तात्काळ’; म्हणजे काय रे भाऊ ? ज्यामध्ये असते कन्फर्म तिकीट मिळण्याची गॅरेंटी

primium tatkal

IRCTC : आपल्याला माहितीच असेल की भारतीय दळणवळणाच्या साधनांमध्ये रेल्वे ही खूप मोठी भूमिका बजावत आहे. लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वे सेवा म्हणजे जगातील सर्वात मोठी चौथी रेल्वे सेवा आहे. त्यातही दूरच्या किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. पण तुम्हाला माहितीच असेल रेल्वेने प्रवास (IRCTC) करणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच मोठी आहे. म्हणुनच ऐन वेळी रेल्वेचे तिकीट मिळवण्यासाठी मोठी मारामार असते. म्हणूनच आज आम्ही रेल्वेच्या अशा सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल. आजच्या लेखात जाणून घेऊया रेल्वेच्या ‘प्रिमिअम तात्काळ’ तिकीट बुकिंग विषयी …

प्रीमियम तत्काळ म्हणजे काय? (IRCTC)

ट्रेनची तिकिटे अनेक प्रकारे बुक करता येतात. एक तिकीट सोप्या पद्धतीने तर दुसरे तिकीट तत्काळ तिकीट म्हणून बुक केले जाते. आता तत्काळ सारखे प्रीमियम तत्काळ (Premium Tatkal) बुकिंग आहे. तत्काळ व्यतिरिक्त, भारतीय रेल्वेने आणखी एक नवीन कोटा सुरू केला आहे, जो तत्काळ सुविधेसारखाच आहे. प्रीमियम तत्काळ कोट्यातील बुकिंग देखील तत्काळ प्रमाणेच केले जाते आणि त्याचे बुकिंग (IRCTC) देखील तत्काळ प्रमाणेच एक दिवस आधी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते.

एसी क्लासच्या तिकिटांचे बुकिंग सकाळी १० वाजल्यापासून सुरू होते, मात्र नॉन-एसी वर्गाच्या तिकीटांचे बुकिंग सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होते. त्याची खास गोष्ट म्हणजे याच्या डायनॅमिक किमती आहेत म्हणजेच ट्रेनचे भाडे सतत बदलत (IRCTC) असते. यामध्ये, तत्काळ तिकीट बुकिंगपेक्षा जास्त भाडे प्रिमिअमचे असू शकते.

तात्काळ आणि प्रिमिअम तात्काळ मध्ये फरक काय ? (IRCTC)

आता प्रश्न असा आहे की जर दोन्ही बुकिंग झटपट मिळत असेल तर दोन्हीमध्ये वेगळेपण काय ? तत्काळ तिकिटाच्या किमती स्थिर राहतात आणि किलोमीटर किंवा क्लासचा विचार करून त्या निश्चित केल्या जातात. प्रीमियम तत्काळ श्रेणीमध्ये दर बदलत राहतो. यामध्ये तिकिटांना मागणी असल्यास तिकिटाचा दर खूप जास्त असेल आणि दर तत्काळपेक्षाही जास्त असेल.

IRCTC वेबसाईट वरूनच होते बुकिंग

हे तिकीट फक्त IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरूनच बुक केले जाऊ शकते, परंतु तत्काळ हे IRCTC व्यतिरिक्त इतर अनेक वेबसाइटवरून बुक केले जाऊ शकते.

ताटकाला तिकीट प्रवाशांसाठी लवकर ओपन होते आणि लगेच बंदही होते. मात्र प्रिमिअम तात्काळ यूजर्सना तिकीट बुक करण्यासाठी वेळ मिळतो. ज्याप्रमाणे तत्काळमध्ये तिकिटे कमी वेळात संपतात, त्याचप्रमाणे प्रीमियम तत्काळमध्ये तिकिटे संपायला थोडा वेळ लागतो आणि काही काळानंतर तिकिटे संपतात. प्रिमिअम चे बुकिंग करण्याचे नियम तत्काळ सारखेच आहेत आणि ते फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच बुक केले जाऊ शकतात.

अजित पवारांनी दुसऱ्याच्या पक्षात नाक खुपसू नये; शरद पवारांचा जोरदार पलटवार

Ajit And Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजित पवार गट आणि शरद पवार गट एकमेकांवर टीकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. यात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये देखील टीकाटिपणी होत असलेली पाहायला मिळत आहे. कारण की, गेल्या दोन दिवसांपूर्वीच “शरद पवार पक्षात स्वत: निर्णय घेतात पण बाहेर आल्यानंतर पक्षाचा निर्णय सर्वानुमते असल्याचे सांगतात” अशा टीका अजित पवार यांनी शरद पवारांवर केली होती. आता त्यांच्या याच टीकेला शरद पवार यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

सातारामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, “अजित पवारांनी त्यांचा पक्ष चालवावा, दुसर्‍याच्या पक्षात नाक खुपसू नये” असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेवर दिले आहे. तसेच, “मागील निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांना मिळून लोकसभेच्या 6 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत इंडिया आघाडीचे 30 ते 35 खासदार महाराष्ट्रातून निवडून येतील, याची खात्री आहे. इंडिया आघाडीला महाराष्ट्रातील लोकांचे समर्थन मिळत आहे. हे पाहून मोदींचा आत्मविश्वास निघून गेला आहे.” असा टोलाही पवारांनी मोदींना लगावला आहे.

इतकेच नव्हे तर, “भाजपची ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग बूथच ताब्यात घेण्याचा प्रकार केला, याबाबत निवडणूक आयोगानेच लक्ष घालावे” अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. तसेच, मतदानाच्या वेळी पैसे वाटल्याच्या प्रकारावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले जात होते, याचे फोटो, व्हिडीओ फिरत होते. माझ्या आतापर्यंतच्या राजकारणात पैसे वाटून मते विकत घेण्याचा प्रकार कधी केला नाही. आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात रुजू पाहतेय, हे धोकादायक आहे”

Dangerous Stunt Video : रेल्वेच्या छतावर चढून तरुणाची DANGER स्टंटबाजी; हाय-व्होल्टेज तारांना हात लागल्याने जागीच…

Dangerous Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dangerous Stunt Video) आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. काहीही म्हणजे अगदी काहीही. अगदी जिवावर उदार होतानाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेक लोक विविध प्रकारच्या स्टंटबाजी करताना लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध होतात. त्यामुळे गेल्या काही काळात स्टंटबाजीचे पराक्रम मोठ्या प्रमाणात वाढताना दिसले आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरुण भरधाव वेगातील रेल्वेवर स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल व्हिडीओ (Dangerous Stunt Video)

रेल्वेने प्रवास करतेवेळी तुम्ही अनेकदा स्पीकरवर ऐकू येणाऱ्या सूचना ऐकल्या असतील. मात्र, या सूचनांचे पालन करणारे फार कमी लोक आहेत. रेल्वेच्या दरवाजावर लटकणे, रेल्वेच्या छतावर चढून बसणे या सगळ्या गोष्टी आजकाल सामान्य वाटू लागल्या आहेत. अशा स्टंटबाजीच्या नादात अनेक लोकांनी जीव गमावला आहे. मात्र, तरीही अशा घटना अद्याप थांबलेल्या नाहीत हे दुर्दैव. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक तरुण असेच एक धोकादायक कृत्य करताना दिसत आहे.

https://twitter.com/brutalvidss/status/1788389369289576856

या व्हिडिओत एक तरुण रेल्वेच्या खिडकीतून बाहेर येतो आणि त्यानंतर रेल्वेच्या छतावर जाऊ लागतो. क्षणिक मजा आणि प्रसिद्धीसाठी हा तरुण आपला जीव धोक्यात टाकताना दिसतोय. (Dangerous Stunt Video) दरम्यान, व्हिडिओत अचानक तरुणाचा हात हाय व्होल्टेज तारांना लागल्याने बेशुद्ध पडताना दसतोय. हा झटका इतका जबरदस्त होता की, तो तरुण जिवंत असेल का? याबाबत शंका आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर न आल्याने नेमके या तरुणाचे काय झाले? ते सांगता येणार नाही.

हा व्हिडिओ X हँडल Brutal Vids नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी हा तरुण जिवंत राहिला नसेल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. दरम्यान एका युजरने म्हटलंय, ‘व्हायरल होण्यासाठी हे लोक ज्या पद्धतीने स्टंट करतात ते स्वतः मृत्यूला आमंत्रण देत आहेत’. तर आणखी एकाने लिहिले, ‘अशा लोकांवर कठोर कायदा बनवा. नाहीतर, आणखी स्टंटच्या नादात किती लोक मरतील काही सांगता येत नाही’. (Dangerous Stunt Video)

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अहंकार दिसतोय; माजी खेळाडूचा थेट आरोप

Hardik Pandya AB de Villiers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कर्णधार असताना मुंबईने तब्बल ५ वेळा आयपीएल जिंकली मात्र हार्दिकच्या नेतृत्वाखालील पहिल्याच मोसमात मुंबईला साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे सर्वच स्तरातून हार्दिक पंड्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यात आता ३६० प्लेयर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एबी डिव्हिलिअर्सची (AB de Villiers) सुद्धा भर पडली आहे. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदात अहंकार दिसतोय असा आरोप करत एबीने सनसनाटी निर्माण केलीय. तो स्वत:ला धोनीसारखा कूल आणि कंपोज्ड समजतो, पण तसे नाही असेही डिव्हिलिअर्सने म्हंटल.

यूट्यूब चॅनलवर बोलताना एबी डिव्हिलियर्सने म्हंटल, हार्दिक पांड्याची कर्णधारपदाची शैली खूपच धाडसी आहे, त्यामध्ये अहंकार दिसतोय. मला वाटत नाही की तो मैदानावर ज्या पद्धतीने वागतो तो नेहमीच खरा असतो, परंतु त्याने ठरवले आहे की हीच त्याची कर्णधारपदाची शैली आहे. हार्दिक धोनीसारखंच शांत असल्याचे दाखवत असतो. हार्दिकचा नेतृत्वाचा दृष्टीकोन हा गुजरात टायटन्सचा कर्णधार असताना योग्य वाटतं होता कारण गुजरातकडे त्यावेळी युवा खेळाडूंचा संघ होता, मात्र मुंबई इंडियन्समध्ये मात्र तस नाही .. मुंबईकडे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांना हा दृष्टीकोन मान्य नसतो ….

यावेळी डिव्हिलियर्स आपली जुनी आठवण सुद्धा सांगितली. मला ग्रॅम स्मिथ आठवतो. त्यावेळी एक युवा म्हणून मला फक्त त्यांना फॉलो करावे लागले. परंतु इकडे एक रोहित आहे, बुमराह आहे जे म्हणतात कि तु फक्त शांत रहा, सामना कसा जिंकायचा याबद्दल सांग, आम्हाला बढाई मारण्याची गरज नाही असं म्हणत एबी डिव्हिलिअर्सने हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह केलं.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला हा संघ पॉईंट टेबल मध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे. आत्तापर्यंत मुंबईने एकूण १२ सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामन्यात विजय मिळवला असून ८ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. ५ वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला यंदा साजेशी कामगिरी करता आली नाही. हार्दिक पांड्याचे सुमार नेतृत्व मुंबईच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.

SSY OR SIP | SSY की SIP!! मुलीच्या उज्वल भविष्यासाठी कोणती योजना फायदेशीर??

SSY OR SIP

SSY OR SIP | अनेक पालक आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या लग्नासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक करत असतात. परंतु आजकाल अनेक योजना आलेल्या आहेत. त्यामुळे नक्की कशामध्ये गुंतवणूक करावी? हे पालकांना समजत नाही. तर तुम्ही देखील तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना किंवा SIP यापैकी कशामध्ये गुंतवणूक करायची? हा विचार करत असाल, (SSY OR SIP) तर आज आम्ही तुम्हाला या दोन्ही योजनाबद्दल माहिती सांगणार आहोत.

मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सरकार सुकन्या समृद्धी योजना चालवते. या योजनेवर तुम्हाला 8.2% दराने व्याज मिळते. तुम्ही जर तुमच्या मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी असल्यास तिच्या नावाने या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत कमीत कमी 250 रुपये गुंतवणूक करू शकतात. आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयेपर्यंत तुम्हाला गुंतवणूक करता येते. हे गुंतवणूक तुम्हाला 15 वर्षासाठी करावी लागते. आणि मुलीच्या 21 वर्षानंतर ही योजना मॅच्युर होते.

यासोबतच जर तुम्हाला यापेक्षाही चांगला परतावा पाहिजे, असेल आणि यासोबतच तुम्ही जोखीम घ्यायला देखील तयार असाल, तर तुम्ही मुलीच्या नावाने म्युच्युअल फंडात देखील गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही SIPच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागते.

5 हजार रुपयांच्या मंथली डिपॉझिटवर SSY चा परतावा | SSY OR SIP

सुकन्या समृद्धी योजनेत जर तुम्ही दर महिन्याला 5 हजार रुपयाची गुंतवणूक केली, तर वर्षभरात तुमच्या 60 हजार आणि 15 वर्षात 9लाख रुपयांची गुंतवणूक होईल. यानंतर पालकांना योजनेत गुंतवणूक करावी लागणार नाही. यात १८ लाख 71 हजार 31 रुपये तुम्हाला व्याज मिळत आहे. नंतर तुम्हाला 27 लाख 71 हजार 31 रुपये एवढी रक्कम मिळेल.

SIP मध्ये किती परतावा मिळेल

तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये 5 हजार रुपये गुंतवले तर 15 वर्षासाठी 9 लाख रुपयांचे गुंतवणूक करायची. परतावा 12 टक्के एवढा असतो. 12% नुसार हिशोब करुन 15 वर्षात 9 लाखांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला 16 लाख २२ हजार 880 रुपये व्याज मिळेल. 15 वर्षाच्या आत ही रक्कम काढली तर तुम्हाला 25 लाख 22 हजार 880 रुपये मिळतील. आणि ही रक्कम समृद्धी योजनेच्या परताव्याच्या जवळ बसावे.

16 वर्ष गुंतवणूक केली तर 12 टक्के दराने तुम्हाला 29,06,891 रुपये मिळतील सुकन्या समृद्धी योजनेच्या परताव्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि ही योजना जर तुम्ही सरळ 21 वर्षे सुरू ठेवली, तर 12 टक्के दराने एसआयपीच्या माध्यमातून 56 लाख 93 हजार 371 रुपयांपर्यंत रक्कम मिळते.

Tourism : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरु झाली चारधाम यात्रा ; रेल्वेने आणलंय खास टूर पॅकेज

tourism chardham

Tourism : आज दिनांक १० मे म्हणजे अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त समाजाला जातो. आजच्या या खास मुहुर्तावर चारधाम यात्रेची सुद्धा सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खुप मोठे महत्व आहे. हीच चारधाम यात्रा घडवण्यासाठी रेल्वे विभागाने (Tourism) खास टूर पॅकेज आणले आहे. चला तर मग जाणून घेऊया…

आजच्या दिवसापासून यमुनोत्री, केदारनाथ धाम आणि गंगोत्रीचे दरवाजे (Tourism) उघडतील. 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे 2 दिवसांनी उघडले जातील. 15 एप्रिलपासून यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली होती. अहवालानुसार, आतापर्यंत एकूण 21.58 लाख भाविकांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

मुंबई (Tourism)

जर तुम्हाला मुंबईहून चारधाम यात्रेचं टूर पॅकेज बुक करायचे असेल तर त्याची माहिती घेऊया. या पॅकेज मध्ये तुम्ही 11 18 आणि 25 जून रोजी प्रवास करू शकता. हे पॅकेज 11 रात्री आणि बारा दिवसांसाठीचे असेल आणि या पॅकेज मध्ये तुम्हाला बद्रीनाथ, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ सोनप्रयाग, उत्तरकाशी आणि यमुनोत्री या ठिकाणांना भेटी दिल्या जातील. मुंबई (Tourism) पासून सुरु होणारे हे फ्लाईट पॅकेज असेल. जर तुम्हाला दोन लोकांसाठी प्रवास करायचा असेल तर प्रति व्यक्तीसाठी 72 हजार 600 रुपये खर्च येतो. आणि जर तीन लोकांना एकत्र प्रवास करायचा असेल तर प्रतिव्यक्ती 66,800 रुपये तुम्हाला या पॅकेजचा खर्च येईल.

दिल्ली

जर तुम्हाला दिल्लीहून ही चारधाम यात्रा करायची असेल तर हे पॅकेज (Tourism) 15 मे पासून सुरू होत आहे. याच्या मदतीने तुम्हाला बसमधून प्रवास करता येईल. सगळ्यात आधी यमुनोत्री नंतर, गंगोत्री, केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथ यांचे दर्शन तुम्हाला या टूर पॅकेज मध्ये घेता येईल. हे पॅकेज अकरा रात्री आणि बारा दिवसांसाठी असेल. या पॅकेज मध्ये जेवण, हॉटेल आणि बसचा खर्च यांचा समावेश आहे. दोन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रतिव्यक्ती 57 हजार रुपये आणि जर तीन लोकांनी एकत्र प्रवास केल्यास त्यासाठी पन्नास हजार 490 रुपये लागतील आणि जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला सत्तावीस हजार रुपये वेगळे द्यावे लागतील.

हरिद्वार (Tourism)

जर तुम्हाला ही यात्रा हरिद्वार पासून सुरु करायची असेल तर हे पॅकेज 16 मे पासून सुरू होत आहे. हे पॅकेज दहा रात्री आणि 11 दिवसांसाठी आहे. पॅकेज फी दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास प्रतिव्यक्ती 56 हजार 350 रुपये आहेत आणि तीन लोक एकत्र प्रवास करत असेल तर प्रतिव्यक्ती पॅकेज (Tourism) फी 47 हजार चारशे रुपये आहे आणि या पॅकेज मध्ये तुम्हाला बसने प्रवास करावा लागेल

यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या www.irctctourism.com अधिकृत वेबसाईटवर अधिक माहिती जाणून घेऊ शकता