हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाला करोना व्हायरस गुडघे टेकायला लावत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानात सुद्धा करोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पाकिस्तानात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजारवर पोहोचली आहे. दिवसेंदिवस पाकिस्तानला करोना व्हायरसची मगरमिठी बळकट होताना दिसत असून चिंतेत भर पडत आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताप्रमाणे पाकिस्तानात अजूनही पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलेलं नाही. पण पाकिस्तानातील वेगवेगळया प्रांतांनी परस्पराशी संपर्क बंद केला आहे.
पाकिस्तानातून लोक मोठया संख्येने इराणला यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे पुढच्या काही दिवसात पाकिस्तानात करोनाग्रस्त नागरीकांची संख्या आणखी वाढू शकते. यात्रेवरुन परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेले. त्यामुळे पुढच्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठया प्रमाणावर वाढू शकते असा इशारा पाकिस्तानातील डॉक्टरांनी दिला आहे.
कोरोनाचा वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पाकिस्तानात लॉकडाउन केलं जावं अशी मागणी होत होती. मात्र पंतप्रधान इम्रान खान यांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं. ”पूर्ण लॉकडाउन करणं, लोकांना जबरदस्ती घरामध्ये राहण्यास भाग पाडणे शक्य नाही. कारण पाकिस्तानातील २५ टक्के जनता ही दारिद्र्य रेषेखाली जगत असून रोजंदारीच्या कमाईवर आपलं पोट भरते. आम्ही आमची स्थिती लक्षात घेता योग्य ती पाऊलं उचलत आहोत,”असं इम्रान खान यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, पाकिस्तानात करोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानातून लोक मोठया संख्येने इराणला यात्रेसाठी गेलेले यात्री. इराणमध्ये आधीच करोनाने थमं घालत अनेकांचे बळी घेतले आहेत. जगातील सर्वात जास्त करोनाचा तडाखा बसलेल्या देशांमध्ये इराणचा क्रमांक आघाडीवर आहे. त्यामुळ इराणच्या यात्रेवरुन पाकिस्तानी नागरिक देशात परतल्यानंतर हे नागरीक वेगवेगळया भागात विखुरले गेले. त्यामुळे करोनाच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर वाढू शकते असा इशारा पाकिस्तानातील डॉक्टरांनी दिला आहे.