पाकिस्तानातून पळालेल्या महिलेच्या बॅगची जगभर चर्चा, मुंबईतील एका फ्लॅटपेक्षा जास्त आहे किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रणि फराह खान हि पाकिस्तान सोडून गेली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ती फराह खान पाकिस्तानमधून जवळपास 90 डॉलर घेऊन फरार झाली आहे. नुकताच तिचा विमानातील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु झाली. यादरम्यान पाकिस्तानचे नेते आणि माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी मंगळवारी फर्स्ट लेडी बुशरा बिबिस यांची जवळची मैत्रीण फराह खान तिने घेतलेल्या हँडबॅगची किंमत तब्बल 90000 डॉलर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय चलनानुसार या बॅगची किंमत 68 लाख रुपये होते. हि किंमत मुंबईतील एका फ्लॅटच्या किमतीपेक्षाही जास्त आहे.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, फराहचा विमानात बसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी मंत्र्यांचीसुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे. फराह खान दुबईला रवाना झाली असून तिचा पती एहसान जमील गुजर अगोदरच अमेरिकेला रवाना झाला होता. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पदं मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली असल्याचा आरोपी विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा संपूर्ण घोटाळा सहा अब्ज रुपयांचा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरुन हा भष्ट्राचार केला असल्याचा दावा पाकिस्तानच्या मुस्लिम लीगच्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम मवाज यांनी केला आहे. पंजाबचे नुकतेच बडतर्फ झालेले राज्यपास चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी कमावल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आता इम्रान खान यांचे जवळचे आणखी काही सहकारी देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.