हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असून महागाईमुळे जनतेच्या २ वेळच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. 1 किलो पिठासाठी 1 किलोमीटर लांबीच्या रांगा लावल्या जात आहेत. काही ठिकाणी तर वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचेही आपण बघितलं आहे. असं असतानाही पाकिस्तानी नेत्यांकडून यावर तोडगा काढण्यापेक्षा भारतालाच धमकी देण्याचं काम सुरु आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा भारताला अणुबॉम्बची धमकी दिली आहे.
पाकिस्तान मध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना शेख रशीद अहमद यांनी भारताला इशारा दिला आहे. मला सर्वांना सांगायचे आहे, समाज मरायला आणि मारायला तयार आहे. जेव्हा मी बालाकोटमध्ये म्हणालो, भारतीयांनो! आमच्याकडे असे मसाले आहेत, ना बिर्लाजींच्या मंदिराची घंटा वाजणार, ना भारतात गवत उगणार. आणि संपूर्ण जगाला जाहीर करू इच्छितो की एकवेळ आपण उपाशी राहू. आपण नग्न होऊ किंवा अनवाणी पायाने फिरू, पण हा २४ कोटी समाज जिवंत आहे. तो पाकिस्तानसाठी लढेल आणि मरेल.
Call for destruction of Hindu temples using 'special nuclear Masala bombs' in rally of Imran Khan by 16 times minister of Pakistan.
Same Imran Khan for whom Amitabh, Gavaskar, Bollywood, cricketers & some aunties in India raised massive funds in 1990s.pic.twitter.com/tUdyKVZFBY
— Pakistan Untold (@pakistan_untold) March 27, 2023
शेख रशीद अहमद यांनी यापूर्वी सुद्धा 2019मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली होती. आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, म्हाला पाहिजे तिथे आम्ही हल्ला करू शकतो असे ते म्हणाले होते. शेख रशीद अहमद हे इम्रान खान यांचा पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पाकिस्तानचे 38 वे गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.