पालघर : हॅलो महाराष्ट्र – पालघरमध्ये एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृत विद्यार्थ्यांचे नाव चेतन खंदारे असे असून तो मागच्या तीन आठवड्यांपासून बेपत्ता होता. पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ चेतन खंदारे याचा मृतदेह आढळून आला आहे. चेतनची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
तीन आठवड्यांपासून बेपत्ता
तीन मार्चपासून 21 वर्षीय चेतन खंदारे बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चेतन पालघरमधील सेंट जॉन्स कॉलेजमधील सिव्हिल इंजिनिरंगमध्ये शेवटच्या वर्षातील विद्यार्थी होता. आता थेट त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मोहरे ब्रिजजवळ कुजलेला मृतदेह
पालघर – बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिजजवळ या चेतनचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चेतनची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याने आत्महत्या केली, त्याच्यासोबत घातपात झाला, की त्याचा अपघात झाला याचा तपास पालघर पोलीस करत आहेत.