दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपुरात ११०० नागरिकांची आर्थिक फसवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । दामदुप्पट रक्कम देण्याचे अमीष दाखवून पंढरपूर परिसरातील सुमारे अकराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे ही समोर आले आहे. त्यामुळे मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार ठकसेनांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की या ठकसेनांनी मातृभूमी या तथाकथीत नावाची पंढरपुरात कंपनी सुरू केली आणि २०१२ पासून या कंपनीच्या नावाने पंढरपूरसह परिसरातील हजारो गुंतवणूकदारांना गळाला लावल्याचे काम सुरु होते. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर याप्रकरणी बाळासाहेब कुंडलिक लोखंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून कंपनीचे प्रदीप रवींद्र गर्ग ,संजय हेमंत बिस्वास, आनंद जाधव या चौघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

पंढरपूरमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळया घालून हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; कोबेच्या मुलीसह ९ प्रवाशी ठार

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच