मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला…असा तरुण बहुजन नेता बनायला खूप कष्ट लागतात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे रविवारी पहाटे निधन झाले. पुणे येथील जहाँगिर हाॅस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कोरोनासोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. सातव यांच्या निधनाने देशाने एक मोठा नेता गमावला असल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी सातव यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव सातव यांच्यासारखा उमदा तरुण बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सातव यांच्याप्रती असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव हे भाजप नेते गोपनाथ मुंडे यांचे लाडके युवा नेते होते. आज त्यांच्या निधनाने साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे अशी भावना पंकजा यांनी ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

दरम्यान, राजीव सातव यांच्या पार्थिवावर मूळगावी कलमदोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ‘राजीव सातव यांचं पार्थिव थोड्यात वेळात पुण्यातून हिंगोलीच्या दिशेने रवाना झाले आहे. सातव यांच्या पार्थिवावर त्यांचं मूळगाव असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कळनमुरी याठिकाणी उद्या 17 मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.

हे पण वाचा – 

Leave a Comment