बीड : हॅलो महाराष्ट्र – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं तरीही मला संपू शकत नाहीत जर मी तुमच्या मनात असेल तर असं म्हणत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हे विधान केले.
मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य pic.twitter.com/st0U0tcaJn
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 27, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा निमित्त बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे आयोजित “समाजातील बुद्धिजिवी लोकांच्या सोबत संवाद” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शन म्हणून भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यावेळी म्हणाल्या कि, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकतं नाही. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तरी ते मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर, असं वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार