हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । उत्तर चीनमधील पोलिसांनी तीन दिवसांनंतर एका महिलेला तिच्या थडग्यातून जिवंत सोडवले आहे. या महिलेच्या मुलावर असा आरोप आहे की त्याने आपल्या आईला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिला मेलेले घोषित करून पुरले. तीन दिवसानंतर या महिलेस बेशुद्ध अवस्थेत ताब्यात घेण्यात आले. तिला मातीमध्ये हलकेच दफन करण्यात आले होते. आरोपी व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिने पोलिसांना सांगितले की २ मे रोजी तिचा नवरा त्याच्या आईला गाडीत घेऊन गेला होता. सायंकाळी जेव्हा उशिरापर्यंत ती घरी परत आली नाही तेव्हा तिला संशय आला.
आरोपी व्यक्तीच्या पत्नीकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आणि त्याच्या आईबद्दल त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणातळे वास्तव समोर आले. आरोपीची ओळख ५८ वर्षीय मा अशी आहे, ज्याने आपल्या ७९ वर्षीय आई वांगला जिवंत दफन केले.
लोकांनी ऐकला एक प्रकारचा आवाज
आसपासच्या लोकांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो व्यक्ती महिलेला गाडीत घेऊन जात होता, तेव्हा ती विव्हळत होती. यावेळी ती वाचवण्यासाठी मोठ्याने आवाज देत होती. डेली चायना या वृत्तपत्रासह अनेक वृत्तपत्रांनी असे लिहिले आहे की पोलिस खात्याकडून त्यांना या संदर्भात कोणतेही अधिकृत अशी प्रतिक्रिया मिळालेली नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाची अद्याप त्याची चौकशी सुरू आहे, त्यामुळे त्याविषयी कोणतीही अधिक माहिती देता येणार नाही.
आईच्या देखभालीने तो माणूस कंटाळला होता
चायना डेली या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेला अर्धांगवायू झाला होता आणि तिचा मुलगा आईच्या देखभालीने कंटाळलेला झाला होता. ज्यामुळे त्याने असे पाऊल उचलले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.