परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने, आज NRC आणि CAA ला विरोध करत पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला परभणी जिल्ह्यातही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील काही भागात बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालूक्यांमध्ये बंदमुळे जनजीवन विस्कळीत आहे. आरोग्य सेवा वगळता सर्वच दुकाने यावेळी सकाळपासूनच बंद आहेत. रस्त्यावरही दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत आहे.
दरम्यान, आज पाथरी येथेही वंचित बहुजन आघाडी व परिवर्तनवादी संघटनेनं CAA हा काळा कायदा आहे म्हणत जोरदार निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग 61वर निदर्शने करून NRC आणि CAA कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आहे. एकूणच जिल्ह्यात या बंदला, संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस; तरुणपणातील फोटोने घातला चांगलाच धुमाकूळ
#Budget2020: पीएफच्या (PF) नियमात होऊ शकतो मोठा बदल ! ‘या’ लोकांना होईल फायदा