गंगाखेड शहरात चोरीच्या घटनांत वाढ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बनला बिकट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

गंगाखेड शहरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून चोरटे चांगलेच निर्ढावले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोरीला आळा बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा अपयशी झाली असताना, काल रात्री बाजारपेठेमध्ये मोबाईल शॉपी चे दुकान फोडून हजारोंचा माल लंपास करून चोरटे पसार झाल्याची घटना घडल्याने व्यापाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गंगाखेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट बनला असून, चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये बुधवारी रात्री मध्यवस्तीत असलेल्या बाजारपेठेत, एक मोबाईल शॉपी फोडून, चोरट्यांनी दुकानातील माल लंपास केला आहे. गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या, कृष्णा मोबाईल शॉपी मध्ये काल रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत, दुकानातील मोबाईल आणि इतर साहित्य लंपास केलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुकानांमधून एकूण किती रुपयांचा माल चोरीला गेला, याची मोजदाद अद्याप बाकी आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.