नवी दिल्ली । जर तुम्हाला सकाळच्या चहाच्या कपासोबत जर बिस्किटे मिळाली तर त्याची मजा दुप्पट होईल. बिस्किटे ही एक अशी गोष्ट आहे जी मुले, वडीलधारे, वृद्ध सर्वांना फारच आवडतात. जर आपण बिस्किटांबद्दल बोललो तर प्रत्येकाच्या मनात पहिले नाव येते पारले-जी (Parle-G). हे बिस्किट केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगात देखील लोकप्रिय आहे. त्याचवेळी, पारले-जी हे भारतातील सर्वाधिक विक्री होणारे बिस्किट देखील आहे.
भारतात असे एखादे देखील घर नसेल जिथे पारले-जी नसतील. आजही असे अनेक लोकं अशी आहेत ज्यांचा चहाची सुरुवात पारले-जी पासून सुरू होते. प्रत्येकाने कधी ना कधी ही बिस्किटे खाल्लीच आहे. ही बिस्किटे खूप स्वस्त आणि तितकीच चवदार देखील आहेत.
चला तर मग त्याचा इतिहास जाणून घेऊयात
पारले-जीचा इतिहास 82 वर्ष जुना आहे. याची सुरूवात मुंबईतील विलेपार्ले भागातील एक बंद पडलेल्या जुन्या कारखान्याद्वारे झाली. मोहनलाल दयाल या व्यावसायिकाने हा कारखाना खरेदी केला होता. जिथे त्यांनी कन्फेक्शनरी बनवण्याचे काम सुरू केले. त्या ठिकाणावरून भारताच्या पहिल्या कन्फेक्शनरीच्या ब्रँडचे नाव ठेवण्यात आले. जेव्हा हा कारखाना सुरू झाला तेव्हा फक्त त्यांच्या कुटुंबातील लोकंच त्यात काम करायचे.
बिस्किटे बनवण्याचे काम हा कारखाना सुरू झाल्याच्या 10 वर्षानंतर 1939 मध्ये येथेच सुरू झाले. सन 1939 मध्ये त्यांनी या कुटुंबाच्या या व्यवसायाला ऑफिशियल नाव दिले. पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नावाखाली बिस्किटे मोठ्या प्रमाणात बनवण्यास सुरवात झाली. स्वस्त दर आणि चांगल्या गुणवत्तेमुळे ही कंपनी लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाली. त्यावेळी पारले बिस्किटचे नाव होते पारले ग्लुको.
1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात गव्हाची अचानक टंचाई निर्माण झाली. गहूच मुख्य स्रोत असल्याने पारले यांना त्याच्या ग्लूको बिस्किटांचे उत्पादन थांबवावे लागले. यानंतर काही काळ याचे उत्पादन थांबवण्यात आले.
80 च्या दशकात पारले ग्लुकोवरून झाले Parle-G
ऐंशीच्या दशकापर्यंत या बिस्किटला ग्लुको बिस्किट असे म्हटले गेले मात्र नंतर त्याचे नाव बदलले. त्याचे नाव Parle-G ठेवले गेले. G म्हणजे जिनिअस, तर पारले हा शब्द मुंबईतील उपनगरी भागातील विलेपार्ले येथून आला आहे. ग्लुको बिस्किटमधून Parle-G ची निर्मिती झाल्यावर बिस्किटाच्या कव्हरवरील चित्रही बदलले.
पूर्वीच्या बिस्किटांच्या पाकीटावर एक गाय आणि गवळण मुलगी लावली गेली होती. यामागील मेसेज असा होता की, बिस्किटमध्ये दूध पिण्याइतकीच एनर्जी आहे. Parle-G चे नाव घेतल्यानंतर गाय आणि गवळण मुलगी काढून टाकण्यात आली आणि त्या जागी लहान मुलीचे छायाचित्र लावले गेले.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये 80 वर्ष जुना विक्रम मोडला गेला
Parle-G बिस्किटने कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी लावलेल्या लॉकडाऊनमध्ये एक नवीन विक्रम नोंदविला. Parle-G बिस्किटांची इतकी विक्री झाली आहे की, त्यामुळे गेल्या 82 वर्षातील विक्रम मोडला गेला आहे. कंपनीच्या एकूण बाजारातील वाटा सुमारे 5 टक्क्यांनी वाढला असून यापैकी 80-90 टक्के वाढ Parle-G ने सेल केली आहे. जर आपण भारताबद्दल चर्चा केली तर आज देशभरात 130 हून अधिक कारखाने आणि सुमारे 50 लाख रिटेल स्टोअर्स आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा