नवी दिल्ली । अभिनेता सुशांतसिंह राजपूत (sushant singh rajput) आत्महत्येचं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालायने दिल्यानंतर पार्थ पवार (parth pawar) यांनी ट्विट केलं आहे. सत्यमेव जयते, असं सांगत पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अभिनेता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पार्थ यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
पार्थ पवारांनी सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिलं होत. त्यावर शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार नाराज झाले होते. त्यामुळे ते मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षातून आणि कुटुंबातून त्यांची समजूतही काढली जात होती. पवारांनी झापल्यानंतरही पार्थ यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केल्याने पार्थ यांची ही भूमिका पक्षविरोधी असल्याचं बोललं जात असून पक्ष त्याबाबत काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”