Satara News : मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गावर अपघातात पाटण पंचायत समितीचा कर्मचारी ठार

Acciden News Patan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाटण तालुक्यातील मल्हारपेठ- पंढरपूर राज्य मार्गावर उंब्रज- मसूर जाणाऱ्या रोडवर ट्रकला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील 1 ठार झाला असून आणि 1 जखमी झाला आहे. अपघातातील दोघेही पाटण पंचायत समितीचे कर्मचारी आहेत. सोमवारी वडोली भिकेश्वर (ता.कराड) गावच्या हद्दीत शशीधन पेट्रोल पंपासमोर ही घटना घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज- मसूर रोडवर सोमवारी सकाळी वीट भट्टीवरून एक ट्रक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होता. यावेळी ट्रकच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी (क्रमांक MH11 AY 8720) ने ट्रक (क्रमांक MH09 L 6970) वर जोरदार आदळली. या अपघातात दुचाकी चालक रवी कुमार नारायण लोहारो (वय- 41, रा. पुसेसावळी, ता. खटाव) हा गंभीर जखमी होवून ठार झाला. तर सिद्धेश्वर रणदिवे हा जखमी झाला आहे.

ट्रक चालक व तेथील नागरिकांनी अपघातानंतर जखमींना उपचारासाठी कराड येथे दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच रवी लोहारे हा मृत झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाले असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मुळीक करत आहेत.