हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्यावतीने आज राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आले. यावरून आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. पुरस्काराच्या नाव बदलावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला जात आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करीत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार करण्यात आले असल्याची माहिती दिली. यापूर्वी हा पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने होता. मोदी यांच्या या पुरस्कार नावाच्या बदलाच्या माहितीनंतर काँग्रेस नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यावर पटोले यांनी म्हंटले आहे कि, मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे. परंतु केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते.
पंतपधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत नाव बदलाच्या दिलेल्या माहितीनंतर आता काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून याचा निषेध नोंदविण्यात आलेला आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निषेधानंतर मोदी सरकारवर काँग्रेस नेत्यांकडून हल्लाबोल केला जाऊ लागला आहे.