पुणे । गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांना त्यांची ९ मिनटं मागितली होती. येत्या ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्यास सांगितलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं होतं. परंतु, हे करत असताना काय करायचं? काय नाही? याबाबत सरकारनं काही सूचना दिल्या आहेत ज्या तुम्ही पाळणं गरजेचं आहे.
काय करायचं? काय नाही?
१) दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर करू नका. सॅनेटायझरमधील अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ असल्यानं त्याचा काही अंश हातावर राहिल्यास दिवे लावताना तुमचा हात भाजू शकतो. तेव्हा केवळ हात स्वच्छ करून दिवे लावा. अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत.
२) मेणबत्त्यांसाठी दुकानात गर्दी करू नका. घरातीलच दिवे वापरून सहभागी व्हा.
३) फक्त घरातील लाईट बंद करा. टीव्ही, फ्रिज, एसी बंद करू नका.
४) घरातील मेन स्विच बंद करू नका. केवळ लाईट बंद करा.
५) सोसायटीचं स्विच बंद करू नका.
६) रात्री ९ ते ९ वाजून ९ मिनिटे लाईट घालवावी. त्यानंतर एकाच वेळी लाईट सुरु करू नका.
८) घरातही दिवे लावताना सोशल डिस्टन्स पाळा. दिवे लावताना गर्दी करू नका.
९) सर्वात महत्वाचे दिवे फक्त अंगणात किंवा बाल्कनीत लावा. दिवे लावून रस्त्यांवर येऊ नका.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६६१ वर, तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?
सावधान! आज दिवे लावण्याआधी सॅनेटायझर वापरू नका, नाही तर..
पुण्यात करोनाने घेतला दोघांचा बळी; राज्यातील मृतांचा आकडा वाढला
राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत
अंडरवर्ल्ड डाॅनची क्वीन’वर नजर; पॅरोलवर सुटताच डॅडी अरुण गवळीचा नवा ‘गेम
उद्धव ठाकरेंनी जिचं कौतुक केलं ‘ती’ आराध्या आहे तरी कोण..