हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tax : ITR भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. यासाठी अनेक वेळा मुदत वाढही देण्यात आली आहे. ज्यानंतर आता ती 31 जुलै करण्यात आली होती. ITR मध्ये आपल्याला आपल्या उत्पन्नाची अचूक माहिती द्यावी लागते. हे लक्षात घ्या कि, सेव्हिंग अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजावरही आपल्याला इन्कम टॅक्स द्यावा लागतो हे अनेकांना माहित नाही.
FD,RD आणि PPF सुरक्षित असल्याने त्यामध्ये लोकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. मात्र इन्कम टॅक्सच्या नियमांनुसार बचत योजनांमधून मिळणारे व्याज हे ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ मानले जाते. यामुळेच सेव्हिंग अकाउंट, FD आणि RD वर मिळणाऱ्या व्याजावर देखील Tax आकारला जातो. तसेच बँकी देखील TDS कापू शकते. मात्र हे लक्षात ठेवा कि, आयकरदात्याचे एकूण उत्पन्न हे सूट दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तरच त्यावर टॅक्स आकारला जाईल. यामध्ये इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C, 80D च्या मदतीने इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना आपले कर दायित्व कमी करता येईल.
PPF व्याजावरील टॅक्स
PPF हे गुंतवणूकीचे सर्वात लोकप्रिय साधन आहे. कारण यामध्ये पैशाच्या सुरक्षिततेबरोबरच चांगले व्याज देखील मिळते, तसेच यामधील व्याजावर कोणताही Tax द्यावा लागत नाही. PPF डिपॉझिट्स, व्याज आणि शेवटी मॅच्युरिटी रक्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे ही पूर्णपणे टॅक्स फ्री गुंतवणूक आहे.
FD व्याजावरील टॅक्स
जर एखाद्याला बँक FD वर 40 हजार रुपयांपेक्षा कमी व्याज मिळाले तर त्यावर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 50,000 रुपयांपर्यंतच्या FD वर कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 10 टक्के TDS कापला जाईल. याच बरोबर जर FD मधून व्याज उत्पन्न जोडल्यानंतरही एकूण उत्पन्न कर सवलतीच्या मर्यादेमध्ये (2.5 लाख रुपये प्रतिवर्ष) असेल तर TDS मधून सूट मिळेल.
RD व्याजावरील टॅक्स
जर एखाद्याच्या RD चे व्याज उत्पन्न 40,000 रुपयांपर्यंत असेल तर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना कोणताही Tax द्यावा लागणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सूट 50,000 रुपयांपर्यंत असेल. मात्र याहून जास्तीच्या रकमेवर 10 टक्के TDS कापला जाईल.
फॉर्म 15H आणि 15G द्यावा लागेल
जर FD किंवा RD मधून मिळणारे वार्षिक व्याज उत्पन्न हे 40,000 आणि 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, मात्र एकूण वार्षिक उत्पन्न (व्याज उत्पन्नासह) त्यावर Tax आकारणीच्या मर्यादेपर्यंत नसेल, तर बँक TDS कापू शकत नाही. मात्र यासाठी ज्येष्ठ नागरिकांना बँकेत फॉर्म 15H आणि इतरांना फॉर्म 15G द्यावा लागेल. हे दोन्ही सेल्फ डिक्लेरेशन ज्याद्वारे हा फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न कर मर्यादेच्या बाहेर आहे हे सांगितले जाते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/
हे पण वाचा :
FD Rates : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेने देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीनदर तपासा
PAN-Aadhaar Link करण्यासाठी उरले फक्त 3 दिवस !!! त्यासाठीची प्रक्रिया पहा
आता Post Office च्या लहान बचत योजनांवरील व्याजदर देखील वाढणार !!!
Eoin Morgan : इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार लवकरच घेणार निवृत्ती !!!
Gold Price Today :सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे दर पहा