हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PBI factcheck : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारांकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप, मुलींना सायकल देण्यासारख्या योजनांचा समावेश आहे. सध्या सोशल मीडियावर एक असाच मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जात असल्याचे म्हंटले गेले आहे. इतकेच नाही तर या मेसेजसोबत एक लिंकही देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक करून मोफत लॅपटॉपसाठी अर्ज करता येईल, असे सांगण्यात आले आहे.
खरंच सरकार कडून विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जात आहे का??? सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या व्हायरल झालेल्या मेसेजमागच्या सत्यतेची तपासणी केली आहे. ज्यामध्ये हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले गेले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून PIB ने लोकांना याबाबतची माहिती दिली आहे. PBI factcheck
PIB factcheck
याबाबत PIB ने म्हटले की,” सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतो आहे ज्यामध्ये शिक्षण मंत्रालयाकडून 5 लाख विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप दिले जातील, असे सांगितले आहे.” दरम्यान पीआयबीने हा मेसेज खोटा असल्याचे सांगत केंद्र सरकारकडून सध्या अशी कोणतीही योजना राबविली जात नसल्याचे म्हंटले आहे. अशा मेसेजपासून सावध राहण्याच्या सूचना देखील पीआयबीने सर्वांना दिल्या आहेत. PBI factcheck
अशा प्रकारे करता येईल factcheck
आजकाल जवळपास प्रत्येकाकडे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशाच तंत्रज्ञानाचा फायदा घेत सोशल मीडियावर दररोज फेक मेसेज व्हायरल केले जातात आणि त्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून लोकांची फसवणूक देखील केली जाते. जर आपल्याकडेही असा एखादा खोटा मेसेज आला असेल तर त्याची सत्यता तपासता येईल. यासाठी https://factcheck.pib.gov.in या वेबसाईटला भेट देता येईल. तसेच व्हॉट्सऍप नंबर 8799711259 वर मेसेज पाठवूनही सत्य तपासता येईल. PBI factcheck
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://pib.gov.in/factcheck.aspx
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून आज 200 गाड्या रद्द !!! रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
FD Rate : खाजगी क्षेत्रातील ‘या’ आघाडीच्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा
EPFO च्या ‘या’ योजनेअंतर्गत खातेदाराला मिळतो 7 लाख रुपयांचा मोफत विमा, त्याबाबत जाणून घ्या
Vehicle Scrappage Policy म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या
FD Rates : ‘या’ स्मॉल फायनान्स बँकांकडून FD वर दिले जाते आहे जास्त व्याज