मुंबई । कोविड-19 महामारी सुरू झाल्यापासून गेल्या आठवड्यात व्यवसायिक घडामोडी 14 टक्के पॉइंट्स (PP) च्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. लोकं कामाच्या ठिकाणी परतल्याने व्यावसायिक घडामोडी वाढल्या आहेत. सोमवारी एका रिपोर्ट्स द्वारे ही माहिती देण्यात आली.
नोमुरा इंडिया ‘बिझनेस रिझम्पशन इंडेक्स’ (NIBRI) म्हणजेच, व्यवसायिक घडामोडीचे मोजमाप करणारा निर्देशांक, 21 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात 114 वर गेला, जो मागील आठवड्यात 110.3 होता.
एका जपानी ब्रोकरेज कंपनीनुसार गुगल वर्कप्लेस ट्रॅफिक 18.1 टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, कामगार सहभाग दर 39.8 टक्क्यांवर मंद राहिला तर वीज मागणी मागील आठवड्यापेक्षा 0.2 टक्क्यांनी वाढली. त्यात मात्र गेल्या आठवड्यात साडेपाच टक्क्यांनी वाढ झाली होती. कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दर 9.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, मात्र पुरवठा साखळीतील समस्यांमुळे तो एक टक्क्याने घसरण्याची शक्यता आहे.