Wednesday, June 7, 2023

मित्रांची पैज पडली महागात!! 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिल्याने व्यक्तीचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये एका व्यक्तीला दारूची पैज लावणं जीवावर बेतलं आहे. मित्रांनी पैज लावल्यांनंतर अवघ्या 10 मिनिटांत 3क्वार्टर दारू पिल्याने जय सिंह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

याबाबत माहिती आधी कि, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पग्राममधील जय सिंहआणि त्याचे मित्र भोला आणि केशव यांच्यामध्ये 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू प्यायची पैज लागली. यावेळी जय सिंहने 10 मिनिटांत 3 क्वार्टर दारू पिऊन पैज जिंकली, मात्र इतक्या फास्टमध्ये दारू पिल्यामुळे त्याची तब्येत इतकी बिघडली की तो बेशुद्ध झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जय सिंहचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर जय सिंहच्या नातेवाईकांनी भोला आणि केशवविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जय सिंह च्या मृत्यूनंतर त्याच्याकडे असलेले ६० हजार रुपये सुद्धा गायब झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या संपूर्ण प्रकरणी सदर आरोपींवर नियमानुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती शहराचे पोलीस उपायुक्त विकास कुमार यांनी दिली.