हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tinder : आजकाल जवळपास सर्वच कामे डिजिटल पद्धतीने केली जात आहेत. मात्र, यारम्यान सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीयरित्या वाढ झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. आजकाल फसवणूक करणाऱ्या लोकांकडून पैसे लुटण्यासाठी दररोज नवनवीन मार्ग वापरले जात आहेत. यासाठी सोशल मीडिया किंवा इतर वेबसाइट्सच्या माध्यमाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. अशीच एक काहीशी विचित्र घटना सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये टिंडरच्या माध्यमातून एका व्यक्तीची तब्ब्ल 14 कोटींहून जास्त रुपयांची फसवणूक केली गेली. या व्यक्तिला टिंडरवरील आपल्या ‘प्रेमी’कडून डिजिटल मनीमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवण्यात आले. ज्यामध्ये त्याची मोठी फसवणूक झाली.
फायनान्शिअल एक्सप्रेस मधील बातमीनुसार, हाँगकाँगमध्ये राहणारी 55 वर्षीय इटालियन व्यक्ती या फसवणुकीची शिकार झाली आहे. त्याची टिंडरवर कोणाची तरी ओळख झाली. त्यानंतर त्याने त्या व्यक्तीबरोबर ऑनलाईन डिजिटल रोमँटिक संबंध सुरू केले. Whatsapp च्या माध्यमातून सतत ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. मात्र, नंतर टिंडरवर एका महिलेच्या रूपात त्याच्याशी बोलणारी व्यक्ती एक सिंगापूरस्थित गुन्हेगार असल्याचे उघड झाले. ही घटना फेब्रुवारीच्या मध्यात घडली आहे.
मीडिया रिपोर्ट्स नुसार, या दोघांमध्ये संबंध निर्माण झाल्यानंतर, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने पीडिताला डिजिटल मनीमध्ये पैसे गुंतवण्यासाठी एका फसव्या ट्रेडिंग वेबसाइटवर साइन इन करण्याचे आमिष दाखवले. फायनान्शिअल एक्सप्रेसकडून एका सूत्राचा हवाला देत साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला सांगितले की, “यादरम्यान पीडित व्यक्तीला डिजिटल मनीमध्ये गुंतवणूक करून जास्त रिटर्न मिळत असल्याचे सांगण्यात आले.”
या रिपोर्ट्समध्ये पुढे असाही खुलासा करण्यात आला की,अखेरीस पीडित व्यक्तीकडून वेगवेगळ्या नऊ बँकेच्या खात्यांमध्ये एकूण 14.2 लाख हाँगकाँग डॉलर्स ट्रान्सफर करण्यात आले. ज्याची किंमत भारतीय चलनामध्ये 14 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यावेळी 6 मार्च ते 23 मार्च दरम्यान झालेल्या 22 हून जास्त ट्रान्सझॅक्शनमध्ये ही रक्कम काढण्यात आल्याचे पोलिसांनी उघड केले. मात्र यानंतर पैसे परत न मिळाल्याने पीडित व्यक्तीला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. ज्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. Tinder
CBS News कडून नोंदवण्यात आलेल्या आणखी एका अशाच घटनेत, एका महिलेला USD 250,000 (2 कोटींहून अधिक) चे नुकसान झाले आहे. यामध्ये हिंज या डेटिंग एपवर ओळख झालेल्या तिच्या प्रियकराने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत तिची फसवणूक केली. Tinder
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://tinder.com/
हे पण वाचा :
फक्त 14 हजार रुपयांत मिळवा iPhone 13 Pro Max, खरेदी करण्यासाठी लोकांची उडतेय झुंबड
Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
Adhaar Card Pan Card Link : 30 जूनपर्यंत पॅन आधारशी लिंक न केल्यास द्यावा लागेल जास्त दंड, याबाबत अर्थमंत्री म्हणाल्या कि…