हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Personal Loan : काही प्रसंगी अनेकदा आपल्याला तातडीने पैशांची गरज भासते आणि अशावेळी आपल्याकडे पैसे नसतात. अशा परिस्थितीत, आपली पैशांची गरज भागवण्यास पर्सनल लोन मदत करते. विशेषत: आपत्कालीन काळात आपला खर्च भागवण्यासाठी लोकांना पैशांची जास्त गरज भासते. पर्सनल लोनद्वारे आपल्याला सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. हे लक्षात घ्या कि, वेगवेगळ्या खाजगी आणि सरकारी बँकाकडून आपल्याला कोणत्याही सिक्युरिटीशिवाय पर्सनल लोन मिळते. मात्र यासाठी प्रत्येक बँकेमध्ये वेगवेगळा व्याजदर असेल.
RBI कडून रेपो दरात वाढ झाल्यानंतर बहुतांश बँकांनी आपल्या Personal Loan वरील व्याजदरही वाढवले आहेत. अशा परिस्थितीत कमी व्याज दरामध्ये पर्सनल लोन मिळणे अवघड बनले आहे. तर आज आपण कमी व्याजदराने पर्सनल लोन देणाऱ्या अशाच काही बँकांची माहिती जाणून घेउयात…
‘या’ बँकांकडून मिळत आहे सर्वात स्वस्त Personal Loan
सध्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पर्सनल लोनचा व्याजदर सर्वात कमी आहे. ही बँक 8.9 टक्के व्याज दराने पर्सनल लोन देत आहे. याशिवाय बँक ऑफ इंडिया 9.75 टक्के आणि पंजाब नॅशनल बँक 9.8 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देत आहे,जो 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
प्रमुख बँकांच्या Personal Loan चे व्याजदर
बँक ऑफ बडोदा 10.2%, कोटक महिंद्रा बँक 10.25%, इंडियन बँक 10.30%, IDFC बँक, इंडसइंड बँक आणि फेडरल बँक 10.49%, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँक 10.55%, ICICI बँक 10.5%, HDFC बँक आणि IDBI बँक 11%, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 11.25% आणि एक्सिस बँक 12% या बँकांचा समावेश आहे.
पर्सनल लोनसाठीची पात्रता
मात्र जर आपल्याला Personal Loan घ्यायचे असेल तर त्यासाठी आपला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवावा लागेल. कारण जर क्रेडिट स्कोअर चांगला असेल तरच तुम्हाला पर्सनल लोन मिळणे सोपे होईल. हे लक्षात घ्या कि, 700 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर हा जास्त चांगला मानला जातो. जर आपला क्रेडिट स्कोअर खूप चांगला असेल तर पर्सनल लोन लगेचच मिळू शकते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/interest-rates/interest-rates/loan-schemes-interest-rates/personal-loans-schemes
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा