चोरट्यांची करामत : पाण्याची वणवण असणाऱ्या ठिकाणी पेट्रोलच्या विहीरी सापडल्या; पुणे- सोलापूर मार्गावरील घटनेने खळबळ

सातारा प्रतिनिधी । शुमभ बोडके

दुष्काळी भागात पाण्याची वणवण असणाऱ्या फलटण- लोणंद येथील झणझणे सासवड (ता. फलटण) येथे चक्क पेट्रोलने भरलेल्या विहीरी सापडल्या. दिवसेंन दिवस पेट्रोलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे हैराण झालेल्या चोरांनी चक्क पुणे- सोलापूर मार्गावरील पेट्रोल पाईपलाईन फोडली. सुदैवाने पेट्रोल कंपनीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मात्र लाखो रूपयांचे पेट्रोल मुरमाड जमिनीत मुरले आहे. पेट्रोल दरवाढीचा फटका बसत असल्याने चोरांच्या या शक्कलीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई- पुणे- सोलापूर मार्गावरून हिंदुस्थान पेट्रोलियमची २२३ किलोमीटर अंतरावरून पेट्रोलची पाईपलाईन नेण्यात आली आहे. पेट्रोलच्या पाईपलाईनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठे भगदाड पाडले आहे. त्यामुळे पेट्रोल वाहून लाखो रुपयांचे हजारो लिटर पेट्रोल जमिनीत गेल्यामुळे या भागातील विहिरीही पेट्रोलनी भरल्या आहेत . जमिनीत मुरलेल्या पेट्रोलमुळे अनेक एकर शेतांतील उभ्या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. यामुळे मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे मात्र पाईपलाईन फोडल्यामुळे मोठ्या प्रमानात

सासवड येथील खडकमाळ नावाच्या शिवारात हा प्रकार झाला असून या परिसरातील १ किलोमीटर अतंरावर दुर्गंधी पसरली असल्याने या भागात नागरिकांना येण्यास मज्जाव केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून विहीरीत साठलेले पेट्रोल कंपनीकडून काढण्याचे काम चालू असून तीन दिवस गळती काढण्याचे काम चालू राहणार आहे. हजारो लीटर पेट्रोल वाया गेल्याने कंपनीचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

You might also like