लग्नाचे अमिश दाखवत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; गर्भवती राहताच दिला लग्नाला नकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सलग दोनवर्ष वारंवार अत्याचार करणार्‍या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी 28 फेबु्रवारी रोजी रात्री हर्सुल येथून अटक केली. त्याला गुरुवार दि.4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दि.1 मार्च रोजी दिले. आकाश अशोक भालेराव (रा. चितेपिंपळगाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात 15 वर्षीय पीडितने फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादी ही आई-वडील, दोन भाऊ आणि आजीसोबत राहते. फिर्यादीची आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. ऑक्टोबर 2020 मध्ये फिर्यादीचे आई-वडील मंगरुळ (ता. जुन्नर जि. पुणे) येथे ऊस तोडीला गेले होते. त्या दरम्यान आरोपी हा त्याच्या मामाला भेटण्यासाठी फिर्यादीच्या गावी आला होता. तेंव्हा आरोपी व फिर्यादी यांच्यात ओळख होऊन ते एकमेकांना बोलत होते. आरोपी हा त्याच्या गावी गेल्यानंतर महिन्याभराने पुन्हा फिर्यादीच्या गावी आला.

दरम्यान फिर्यादीच्या घरी कोणी नसतांना आरोपी हा तिच्या घरी आला त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा महिन्याभरानंतर फिर्यादी ही शेतात कापूस वेचत असतांना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर तिने ही बाब आई-वडील व नातेवाईकांना सांगितली. 21 फेबु्रवारी रोजी फिर्यादीचे आई-वडील व नातेवाईक हे आरोपीच्या घरी गेले. त्यांनी आरोपी व त्याच्या आईकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी नकार दिला.

या प्रकरणात फुलंब्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे 25 फेबु्रवारी रोजी पीडिता बाळांतीण झाली असून तिने एका स्त्रीजातीच्या अर्भकाला जन्म दिला आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी फिर्यादीच्या अर्भकासह आरोपीचे डीएनए नमुने घेवून तपासणीसाठी रासायनिक प्रयोग शाळेत पाठविणे आहे. आरोपीची वैद्यकिय चाचणी करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Leave a Comment