नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) 6 कोटीहून अधिक खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यावेळी त्यांची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होणार. PF खातेधारकांच्या बँक खात्यात लवकरच व्याजाची रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे. EPFO लवकरच 2020-21 साठी 6 कोटीहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज ट्रान्सफर करण्याची घोषणा करू शकते असे सूत्रांकडून समजले आहे.
सरकारने 2020-21 आर्थिक वर्षासाठी ग्राहकांच्या खात्यावर PF वरील 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्यासाठी आधीच ग्रीन सिग्नल दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कामगार मंत्रालयानेही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. आता EPFO लवकरच ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज रक्कम जमा करेल.
EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता, हा व्याज दर गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षातही व्याज समान होते. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज EPF वर उपलब्ध होते आणि पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आले होते. गेल्या आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, KYC च्या अडचणींमुळे अनेकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची वाट पाहावी लागली.
बनावट कॉल्सपासून सावध रहा
EPFO ने आपल्या खातेधारकांना कोणत्याही बनावट कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. EPFO ने आपल्या 6 कोटी PF खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे App डाउनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. EPFO ने ट्विटरवर अलर्ट जारी करताना म्हटले आहे की, ‘EPFO कधीही फोन कॉलवर आपल्या खातेधारकांकडून UAN नंबर, आधार क्रमांक, पॅन नंबर किंवा बँक डिटेल्स विचारत नाही किंवा EPFO त्याच्या खातेधारकाला कोणताही फोन कॉल करत नाही.’
PF खाते
तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. ही एक निश्चित रक्कम आहे, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि PF खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते.
अशाप्रमाणे व्याज तपासा
तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली आहे की नाही हे तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र, EPFO प्रत्येक ग्राहकाला मेसेजिंगद्वारे व्याज ट्रान्सफर केल्याची माहिती देते.
तुम्ही स्वतः मेसेज पाठवून खात्यातील बॅलन्सची माहिती देखील मिळवू शकता. तुम्हाला तुमच्या मोबाईलवर EPFOHO UAN ENG टाइप करून 7738299899 वर पाठवावे लागेल. मेसेजची शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. जर तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. येथे हे लक्षात ठेवा की, तुम्ही त्याच मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवावा लागेल जो UAN मध्ये रजिस्टर्ड असेल.
तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 ला मिस्ड कॉल द्या. यानंतर तुम्हाला EPFO कडून एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या PF खात्याचे डिटेल्स मिळतील.