हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UMANG App : UMANG Appजर 10 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या कंपनीमध्ये काम करत असाल तर साहजिकच आपले पीएफचे योगदान दिले जात असेल. मात्र पीएफ खात्यातील पैसे फक्त रिटायरमेंटसाठी ठेवले जात असले तरीही अनेकदा आपल्याला या पैशांची आवश्यकता भासू शकते. मात्र, या खात्यातील पैसे काढण्यासाठी आपल्याला कारणे द्यावी लागतील. ईपीएफओच्या नियमांनुसार, आपल्या नोकरीची वर्षे आणि आपल्याकडून देण्यात आलेल्या कारणांद्वारे आपल्या पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येऊ शकेल हे ठरवले जाते.
उदाहरणार्थ, जर आपण घर बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी पीएफमधून पैसे काढत असाल तर यासाठी कमीत कमी 60 महिने सर्व्हिस कालावधी पूर्ण केलेला असावा लागेल. हे कारण देऊन 36 महिन्यांचा पगार आणि DA एवढी रक्कम काढता येईल. जर आपल्या खात्यामध्ये इतकी रक्कम असेल तर आपल्या घर खरेदीचा संपूर्ण खर्च इथून मिळवता येईल.
इतर कामांसाठी रक्कम
त्याचप्रमाणे, आपल्याला घरातील लग्नाचे कारण सांगून किंवा दहावीनंतर मुलांच्या शिक्षणासाठीच्या खर्चासाठी पीएफमधून 50 टक्के रक्कम काढता येईल. तसेच आपल्या रिटायरमेंटच्या एक वर्ष आधी, 90% रक्कम काढता येईल. मात्र यासाठी आपले वय 54 वर्षांपेक्षा जास्त असावे. तसेच वैद्यकीय खर्चासाठी, 6 महिन्यांची बेसिक सॅलरी आणि DA किंवा काही प्रकरणांमध्ये संपूर्ण रक्कम काढता येईल. यामध्ये किमान सेवेची कोणतीही अट नसेल.
UMANG App द्वारे अशा प्रकारे काढा पैसे
PF मधून पैसे काढण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र सरकारच्या UMANG App द्वारे, सहजपणे पीएफसाठी क्लेम करता येईल. याद्वारे 3-5 दिवसांत पैसे खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की, EPF मधून पैसे काढण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आपल्या आधारशी लिंक केलेला असायला हवा. चला तर मग UMANG App द्वारेपीएफ पैसे काढण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया जाणून घेउयात…
सर्वात आधी UMANG App डाउनलोड करून यामध्ये स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
तसेच यामध्ये आपला मोबाईल नंबर देखील द्यावा लागेल.
यानंतर App मध्ये लॉग इन करा.
आता आपल्या स्क्रीनवर अनेक पर्यायांमध्ये EPFO देखील दिसेल.
त्यावर क्लिक करा आणि raise claim निवडा.
OTP जनरेट करण्यासाठी UAN एंटर करा.
यानंतर मोबाईलवर आलेला OTP टाका.
आता विड्रॉलचा टाइप निवडा आणि फॉर्म भरा.
अर्ज सबमिट केल्यानंतर, रेफरन्स नंबर असलेली स्लिप मिळेल.
विड्रॉल रिक्वेस्ट ट्रॅक करण्यासाठी याचा वापर करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://web.umang.gov.in/landing/department/epfo.html
हे पण वाचा :
Blue Economy म्हणजे काय ? याद्वारे पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचे उत्पन्न कसे मिळू शकेल ते पहा
Bank FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी !!! आता ‘या’ बँकांच्या FD वर मिळणार 8.80% व्याज
‘या’ LIC योजनेत दररोज 58 रुपयांची बचत करून मिळवा 8 लाख रुपये !!!
PM Kisan योजनेबाबत सरकारचे मोठे वक्तव्य, शेतकऱ्यांचे पैसे वाढवण्यावर सांगितले कि…
RBI Monetary Policy : आता एटीएममधून नोटांऐवजी बाहेर येणार नाणी ! ‘या’ 12 शहरांमध्ये सुरू होणार सेवा