हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : नोकरदारांच्या पगारातून दरमहा काही रक्कम पीएफच्या नावाने कापली जाऊन त्यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा केली जाते. पीएफचे पैसे हे फक्त रिटायरमेंटनंतरच नाही तर अचानक येणाऱ्या आर्थिक गरजांसाठीही खूप उपयोगी पडतात.
हे लक्षात घ्या कि, याआधी रिटायरमेंटनंतर किंवा घर खरेदीसाठी आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ मधील पैसे काढले जाऊ शकत होते. मात्र, कोराना काळामध्ये उद्भवलेल्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली. ज्यामुळे, आता खातेदाराला आपल्या खात्यातून त्याला हवे तेव्हा पैसे काढता येतील. PF Account
मात्र, त्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे जाणून घ्या कि, नोकरी करत असताना आपल्याला संपूर्ण पैसे काढता येणार नाहीत. नियमांनुसार, कोणत्याही खातेदाराला पीएफ खात्यातून तीन महिन्यांची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता किंवा एकूण जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम काढता येतील. यापैकी जेवढे कमी तेवढे जास्त पैसे काढता येतात. PF Account
ऑनलाइन पैसे काढण्यासाठी, सर्वांत आधी अधिकृत वेबसाइट http://epfindia.gov.in वर जावे लागेल. येथे UAN आणि पासवर्ड टाकून आपल्या खात्यात लॉग इन करा.
आता ऑनलाइन सर्व्हिसेस टॅबवर जा आणि क्लेम फॉर्म (फॉर्म-31, 19 किंवा 10C) निवडा. यानंतर आपली बँक खात्याचे शेवटचे 4 अंक एंटर करा आणि ते व्हेरिफाय करा. Proceed to Online Claim वर क्लिक करा. PF Account
ड्रॉप डाउनमधून पीएफ एडव्हान्स निवडा, पैसे काढण्याचे कारण निवडा. पुढे, रक्कम एंटर करा, चेकची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता एंटर करा. Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि मोबाईलवर मिळालेला OTP टाका. ओटीपी एंटर केल्यानंतर, आपला पीएफ क्लेम ऑनलाइन रजिस्टर्ड होईल. PF Account
हे पण वाचा :
‘या’ सरकारी बँकेकडून Home Loan वरील व्याजदरात मिळत आहे सूट
Gold Price Today : दिवाळीनंतरही सोन्या-चांदीच्या दरातील घसरण सुरूच, नवीन दर पहा
Central Bank of India ने FD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा
Credit Card चा अशा प्रकारे वापर करून मिळवा अनेक फायदे !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर तपासा