हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर पुण्यात या संघटनेच्या काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. अशा घोषणा देणाऱ्यांना आपण सोडणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मात्र या सर्व प्रकरणानंतर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा फायदा भाजपलाच होतो असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही? भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? असे एकामागून एक सवाल करत भाजपालाच PFI चा फायदा होतो अस सचिन सावंत यांनी म्हंटल.
PFI वर भाजपा सरकारने अजून बंदी का घातली नाही?भाजपाच्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी पुरावे आहेत हे जाहीर केले होते. भाजपाशासित पुणे महापालिकेने PFI ला कोरोना काळात दफनविधीची जबाबदारी का दिली होती? पोलिस 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणाल्याची पुष्टी का करत नाहीत? भाजपालाच PFI चा फायदा होतो https://t.co/kF5YtR5Bsb
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2022
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते नाना पटोले यांनीही भाजपवर निशाणा साधला. PFI सारख्या संघटनांवर बंदी घालण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. PFI वर बंदी घालण्याची मागणी काँग्रेस पक्षाने याआधीही केली होती. पण केंद्रातील भाजपा सरकार त्यांच्या राजकीय फायद्यासाठी या संघटेवर बंदी घालत नाही का? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. केंद्रात आठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारला पीएफआयच्या कारवायांची माहिती नव्हती का? असा सवालही त्यांनी केला.