जितेंद्र आव्हाडांच्या घरात बॉम्ब; निनावी कॉलने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, त्याबाबत त्यांनी ट्विट देखील केलं होतं. त्यातच आता बॉम्बचा निनावी कॉल आल्याने पोलिसांची पळापळ झाली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाद या बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याच्या एका निनावी फोनमुळे काल रात्री खळबळ उडाली होती. पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा बंगल्यात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा माहिती सापडली नाही. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांच्या बंगल्याची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना त्रास देणारी नेमकी व्यक्ती कोण याचा शोध पोलिस घेत आहेत.

दरम्यान, २ दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याची धमकी आली होती. आव्हाडांनी याबाबत काही फोटो शेअर केले होते. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटल होते. या फोटोमध्ये दिसत असलेला माणूस आणि त्याच्यासोबत असलेला आणखी एक गृहस्थ व्हिडिओ काॅलवर कुणाशी तरी बोलत होते. मला मारण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. ती एका पत्रकाराने ऐकली अन् माझ्या सोबत असणाऱ्या पोलीस आणि मुलांना सांगून सावध केले. मात्र, तेवढ्यात तो हातून निसटून हाॅटेल ट्रायडंटमध्ये १९ व्या मजल्यावर कुठे तरी गेला. ही बाब नंतर माझ्या कानावर घालण्यात आली. माझ्या सोबत असलेल्या मुलांनी त्याचा पाठलागही करण्याचा प्रयत्न केला. पण, तो त्यांच्या हाती लागला नाही.