नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – नंदुरबारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नंदुरबारमधील खोकसा घाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील (accident) जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय घडले नेमके?
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या खोकसा घाटामध्ये हा अपघात घडला आहे. यामध्ये मजुरांच्या पिक अप गाडीचा आपघात झाला आहे. या अपघातात (accident) 2 जणांचा जागीच मृत्यू तर 11 जण जखमी झाले आहेत. पिकअप गाडी वरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
या अपघाताची (accident) माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनाखाली दाबले गेलेल्या मुजरांना ग्रामस्थांच्या साहाय्याने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या पिक अप व्हॅनमध्ये सर्व बांधकाम मजूर होते. ते बांधकाम मुजरीसाठी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातून परत येत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी