PM Cares Fund वरून पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पीएम केअर्स फंडमध्ये जास्तीत जास्त योगदान करण्याचं आवाहन मोदींनी केलं. यानंतर उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडूं, कलाकारांपासून सामान्यांकडून पीएम केअर्स फंडमध्ये मदतीचा ओघ सुरु असताना या फंडच्या स्थापनेवरच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही पीएम केअर्स फंडवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “जवाहरलाल नेहरु यांनी जानेवारी 1948 मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही पंतप्रधानांना नवीन राष्ट्रीय निधी सुरु करण्याची गरज वाटली नाही. पण पीएम केअर्स फंड सुरु करुन नरेंद्र मोदी यांनी सेल्फ प्रमोशन करण्याची संधी सोडली नाही,” असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

आणखी एका ट्वीटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत नुकतंच जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजच्या नवावरही आक्षेप घेतला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “जगातील कोणत्याही नेत्याने त्यांच्या देशात प्रोत्साहन पॅकेजची घोषणा करताना ते राष्ट्रपतींचे पॅकेज किंवा पंतप्रधानांचे पॅकेज किंवा ट्रंप पॅकेज असल्याचे म्हटलं नाही. पण आपल्या भारतात मात्र आर्थिक पॅकेज हे #PMGaribKalyan पॅकेज आहे.”

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याची घोषणा २८ मार्च रोजी केली. पीएम केअर्स फंडची स्थापना एक स्वतंत्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स ऍण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असं या फंडचं पूर्ण नाव आहे. परंतु या फंडच्या स्थापनेनंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले.

देशात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी असताना नव्या पीएम केअर्स फंडची स्थापना करण्याची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. काहींनी तर पीएम केअर्स फंड हा घोटाळा असल्याचंही म्हटलं आहे. हा फंड कॅगच्या कक्षेबाहेर असू शकतो, जेणेकरुन या फंडमधून केलेल्या खर्चावर तसंच वापरावर कोणाची नजर नसेल, म्हणूनच त्याची स्थापना झाल्याचा अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. हाच धागा पकडत पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींवर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा