काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि एक कोरं पान आहे’ अशा शब्दात चिदंबरम यांनी टीका केली.

चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पॅकेजवर टीका करताना म्हटलं कि, “काल पंतप्रधानांनी हेडलाइन आणि कोरं पान दिलं. अर्थमंत्री ते कोरं पान कसं भरतात ते आज आम्ही पाहू. अर्थव्यवस्थेमध्ये सरकारकडून जे पैसे ओतले जाणार आहेत, त्यातल्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमचे बारीक लक्ष असेल. कोणाला काय मिळणार त्याचा सुद्धा आम्ही बारकाईने अभ्यास करु” असे चिदंबरम म्हणाले.

 

वेगवेळया राज्यातून घराकडे निघालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांबद्दल चिदंबरम म्हणाले की, गरीब आणि उद्धवस्त मजुरांनी शेकडो किलोमीटरची पायपीट केली, त्यांना या पॅकेजमधून काय मिळते त्यावरही आमचे लक्ष असेल.दरम्यान, काल मोदींनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज या पॅकेजबद्दल विस्तृत माहिती देणार आहेत. त्यामुळे पॅकेजमधून कुठल्या क्षेत्राला किती लाभ होईल ते स्पष्ट होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment