PM Kisan Samman Nidhi Scheme: पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात येतील 2000 रुपये, जर मिळाले नाही तर त्वरित करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आतापर्यंत 11.17 कोटी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. ही एक अशी योजना आहे ज्यात केंद्र सरकारकडून 100 टक्के रक्कम गुंतविली जात आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन नेहमीच खुले राहील. मग उशीर का करताय? आता आपण घरूनही यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता. जसंजसा हा डेटा वेरीफाय होईल तसतसे लोकांच्या खात्यांत हे पैसे मिळत राहतील. या योजनेचा सर्वाधिक फायदा यूपीला झाला आहे. एकूण 2 कोटी 37 लाख 86 हजार शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाले आहेत.

सध्या सहाव्या हप्त्याचे पैसे पाठविले जात आहेत. हे काम नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत 3 कोटी 77 लाख लोकांना हा हप्ता मिळाला आहे. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या हप्त्याचे पैसे जाहीर केले. त्याअंतर्गत यूपीमध्ये सुमारे 1.54 कोटी शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. जर आपणही यासाठी अर्ज केला असेल तर आपण आपल्या वेबसाइट किंवा ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जाऊन आधार किंवा मोबाइल नंबरद्वारे पैसे मिळले की नाही हे तपासू शकता. जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर समजून घ्या की आपल्या रेकॉर्डमध्ये काहीतरी गडबड आहे किंवा आपले पैसे येणार असतील.

21 महिन्यांची जुनी योजना
पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी 24 फेब्रुवारी 2019 रोजी औपचारिकपणे सुरू करण्यात आली. मात्र, अनौपचारिकरित्या सुरूवात 1 डिसेंबर 2018 रोजी झाली. त्याअंतर्गत प्रत्येक शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.

खात्यात पैसे आले नसल्यास काय करावे?
आपल्या खात्यात पैसे आले नसतील आणि स्टेटस मध्ये एफटीओ (FTO-Fund Transfer Order) पण लिहिलेले आले नसेल तर समजून घ्या की, आपल्या रेकॉर्डमध्ये काहीतरी गडबड आहे. पीएम किसानच्या ऑफीशियल साइटवर जा आणि आपल्या नावात आणि आधारात लिहिलेली स्पेलिंग तपासा. आधारच्या व्हेरीफिकेशनपूर्वी पैसे येत नाहीत. जर आपण चूक दुरुस्त केली तरच पैसे येणे सुरू होईल.

या प्रमाणे स्टेटस तपासा

> या लिस्टमध्ये आपले नाव तपासायचे असेल तर आपण पहिले pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जाऊन, आपला आधार किंवा मोबाईल नंबरद्वारे आपल्याला पैसे मिळाले आहेत की नाही याची तपासणी करू शकता.

नवीन हेल्पलाइनवर कॉल करा
आपल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी मोदी सरकारने 011-24300606 नवीन हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. ‘तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून या क्रमांकावर संपर्क साधू शकता. ज्या शेतकऱ्यांना समस्या आहे त्यांनी कृषी मंत्रालयाच्या फोन नंबरवर थेट संपर्क साधावा अशी सरकारची इच्छा आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना पैसे मिळू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.