PM Kisan Yojana: जर तुम्हाला PM किसान योजनेचा 13 वा हप्ता पाहिजे असेल तर त्वरित करा ‘हे’ काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. एकट्या उत्तर प्रदेशात या यादीतून 21 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. इतर राज्यांचीही हीच स्थिती होती. ई-केवायसी आणि जमिनीच्या नोंदींची पडताळणी न केल्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना 12वा हप्ता नाकारण्यात आला.

तुम्हाला 13व्या हप्त्यापासून वंचित राहायचे नसेल, तर लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. त्याचबरोबर जमिनीच्या नोंदींची लवकरात लवकर पडताळणी करा. जर तुम्ही दोनपैकी कोणतेही एक काम पूर्ण केले नाही तर तुम्ही पीएम किसान योजनेपासून वंचित राहू शकता. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये पहायचे असेल, तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा.

> पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा. > आता होम पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागात क्लिक करा. > फार्मर्स कॉर्नर विभागात ‘लाभार्थी स्थिती’ या पर्यायावर क्लिक करा. > आता पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक यांपैकी कोणताही एक पर्याय निवडा. > तपशील भरल्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा. > आता तुम्हाला तुमचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

येथे संपर्क करा-

तुम्हाला पीएम किसान योजनेबद्दल (PM Kisan Yojana) काही माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. इथे तुमची प्रत्येक समस्या दूर होईल.

दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात-

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवली जाते. शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. पुढील हप्ता आता तीन महिन्यांनंतरच मिळणार आहे.