राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच इंदोर मध्ये त्यांना बॉम्बने उडवण्यात येईल असं धमकीचे पत्र इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात मिळाले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आत्ता महाराष्ट्रात आहे. 24 नोव्हेंबर ही पदयात्रा इंदोर मध्ये जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
इंदूर तहसीलच्या जुनी इंदोर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मिठाईच्या दुकानात धमकीचे पत्र टाकले. दुकानदाराने हे पत्र पोलिसांच्या ताब्यात दिले. हे पत्र उज्जैनहून आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुकानात पत्र टाकून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बंद करण्यात यावी अशी मागणीही राज्यातील शिंदे गटाने केली होती. त्यातच आता राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील राहुल गांधी यांची आज्जी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती