PM Kisan Yojana च्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!! या तारखेला मिळणार 12व्या हप्त्याचे पैसे

PM Kisan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  PM Kisan Yojana : केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालविल्या जातात. हे लक्षात घ्या कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अशाच योजनांपैकी एक आहे.या योजनेंतर्गत केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा केले जातात. तर आता याच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे. पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,000 रुपयांचा हप्ता येऊ शकेल.

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process,  Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

11व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर झाले आहेत

PM Kisan Yojana अंतर्गत, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केला जातो. आतापर्यंतच्या टाइमलाइननुसार 11 व्या हप्त्याचे पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत. आता पुढील 12 वा हप्ता 1 सप्टेंबरला दिला जाऊ शकेल.

How to register complaint regarding PM Kisan Samman Nidhi Yojana | PM किसान  सम्मान निधि की किश्त नहीं मिली तो ऐसे करें शिकायत | Patrika News

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

PM Kisan Yojana चा लाभ घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. ही प्रक्रिया घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येऊ शकेल. याशिवाय या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करता येईल.

PM kisan samman nidhi: Will both husband and wife get the benefit of  Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana? - PM kisan samman nidhi : क्‍या  पति और पत्नी दोनों को मिलेगा

अशा प्रकारे स्टेट्स तपासा

>> सर्वांत आधी PM Kisan Yojana च्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
>> येथे उजव्या बाजूला Farmers Corner चा पर्याय मिळेल.
>> येथे Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. नवीन पेज उघडेल.
>> नवीन पेजवर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकाल.
>> तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. त्यानंतर Get Data वर क्लिक करा.
>> येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रान्सझॅक्शनची सर्व माहिती मिळेल.
>> जर FTO is generated and Payment confirmation is pending असे लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या अमाउंट प्रोसेस होते आहे.

हे पण वाचा :

Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ 3 शेअर्सची गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Cotton Rate : कापसाच्या दरात विक्रमी वाढ, MCX वर कापूस 50,000 रुपयांच्या वर !!!

Bank FD : आता ‘या’ बँकांनी देखील FD चे व्याजदर वाढवले, नवे दर तपासा

Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!

Train Cancelled : जन्माष्टमीच्या दिवशी देखील Railway कडून 157 गाड्या रद्द, अशा प्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा !!!