हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | PM Kisan Yojana केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ देखील होत असतो. केंद्र सरकारची पीएम किसान योजना ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असतो. तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेत समाविष्ट असाल, तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे.
ती म्हणजे आता सरकार लवकरच 2 हजार रुपयांचा पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana ) पुढील 17 वा हप्ता तुमच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. आणि याचा फायदा सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. तुमचे नाव जर या यादीत समाविष्ट असेल, तर 17 वा हप्ता येण्याआधी तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील. अन्यथा तुमच्या खात्यात 17 व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत.
या गोष्टी करणे गरजेचे | PM Kisan Yojana
तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 17 व्या हप्ताचा लाभ मिळवायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याचे संलग्न करणे देखील खूप गरजेचे आहे. जर तुम्ही ही कामे तातडीने केली नाही, तर पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.
पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता
केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये पीएम किसान योजनेतून देतात. दर 4 महिन्यांच्या अंतराने 2 -2 हजाराचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी बियाणे त्याचप्रमाणे इतर सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी सरकारकडून ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि आता शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार 15 मेपर्यंत पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.