PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 2000 रुपये बॅंक खात्यात जमा; असं करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana । राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. आज राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात किसान सन्मान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे पैसे नरेंद्र मोदींनी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

17 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा- (PM Kisan Yojana)

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये वर्ग करण्यात येतात. या योजनेचा चौदावा हप्ता जुलै महिन्यात देण्यात येईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली होती. त्यानुसार, आज या योजनेचे 17 हजार कोटी रुपये 8.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. हे पेैसे स्वत: नरेंद्र मोदींनी जमा केले आहेत. यापूर्वी 27 फेब्रुवारी 2023 रोजी बेळगावी येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. यावेळी, 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,800 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. आता या योजनेचा 14 वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana) लाभार्थ्यांची संख्या 30 लाखांनी वाढली आहे. यातूनच या योजनेचा मोठ्या प्रमाणात शेतकरी फायदा उचलत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा झाला आहे. दरवर्षी तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती दोन हजार रुपये देण्यात येतात. असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात. शेती करत असताना शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला मोदी सरकारकडून मिळणारे २००० रुपये हवे असतील तर आजच मोबाईल मध्ये Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये सरकारी योजना विभागातुन तुम्ही कोणत्याही योजनांना थेट अर्ज करून आर्थिक लाभ मिळवू शकता. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त हवामान अंदाज, जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, शेतीविषयक सल्ले यांसारख्या अनेक सुविधा मोफत मिळतात. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा

तुमच्या खात्यात पैसे आले कि नाही ते कस चेक करणार ?

सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल.

– त्यानंतर तुम्हाला “फार्मर्स कॉर्नर” दिसेल. येथे Beneficiary Status असलेल्या बॉक्सवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला पीएम किसान खाते क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

जर मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसेल तर प्रथम नोंदणी करा. यासाठी तुमच्या फोनवर एक ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल.

आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Get Data वर क्लिक करा.

तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले कि नाही ते दिसेल.