PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

PM Kusum Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । भारत (PM Kusum Yojana) हा कृषिप्रधान देश असला तरी देशातील बहुतांश भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. पाण्याच्या समस्येचा थेट परिणाम पिकांवर होतो. प्रत्येक शेतकरी सिंचनासाठी महागडे साधन वापरू शकत नाही. यासाठी सरकारकडून वेगवेगळे सिंचन योजना रावबल्या जातात. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात मध्ये लोकांना संबोधित करताना कुसुम योजनेचा उल्लेख केला ज्याद्वारे शेतकऱ्याना फक्त 10% पैसे खर्च करून शेतात सौरपंप बसवता येईल.

PM Kusum Yojana

काय आहे पीएम कुसुम योजना 

ऊर्जा मंत्रालयाने 2019 मध्ये कुसुम योजना (PM Kusum Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत 30% केंद्र सरकार, 30% राज्य सरकार आणि 30% इतर वित्तीय संस्थांद्वारे अनुदान दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना वीज आणि डिझेलवर खर्च करावा लागत नाही आणि त्यांचे विजेवरील अवलंबित्वही कमी होते. त्यामुळे लागवडीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो.

PM Kusum Yojana

कुसुम योजनेच्या माध्यमातून सरकारने (PM Kusum Yojana) खर्चात कपात करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पंपाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून उत्पन्न मिळवू शकतात. यातून निर्माण होणारी वीजही शेतकरी वीज कंपनीला विकू शकणार आहेत. जर तुमच्याकडे 4-5 एकर जमीन असेल तर तुम्ही वर्षाला भरपूर वीज उत्पादन करून चांगला नफा मिळवू शकता.

याप्रमाणे अर्ज करा- (PM Kusum Yojana)

या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी राज्यांच्या विविध अधिकृत वेबसाइट्स जारी करण्यात आल्या आहेत. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. तुम्ही https://mnre.gov.in/ वरून यासंबंधी सर्व माहिती मिळवू शकता.