सोलापूर । ‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून दारुडे आहेत’ असं खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्या बांधावरच जाताना गावात जाऊनही घरांची पाहणी केली. तसेच शासनाकडून आलेल्या मदतीचीही विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ”नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून दारुड्या आहेत. ज्याप्रमाणे एखादा दारुडा दारू पिण्यासाठी बायकोला मारतो. दारू पिण्यासाठी पैसे नाही म्हणून आधी घरातील एक-एक वस्तू विकतो. नंतर दारूसाठी एक दिवस घरही विकतो, त्याप्रमाणे मोदी हे देशातील मालमत्ता विकायला काढत आहेत” अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
मोदी हा देशातला पंतप्रधान नसून दारुड्या आहे –
प्रकाश आंबेडकर#HelloMaharashtra #PrakashAmbedkar #NarendraModi @narendramodi @Prksh_Ambedkar pic.twitter.com/5EFMb83xBu— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
याशिवाय, राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडूनच कर्ज काढू शकते. इतर कुणाकडून कर्ज घेऊ शकत नाही. त्यामुळे राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केलीय का? याचा आधी खुलासा केला पाहिजे. जर कर्जाची मागणी केली असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जोर लावून हे कर्ज मंजूर करून घेतलं पाहिजे, असं आंबेडकर म्हणाले. अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि भाजपने राजकारण थांबवावं. टोलवाटोलवी बंद करावी. आधीच लोक कोरोनाने त्रासलेले आहेत. उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्या. मदत द्या. शेतकऱ्यांच्या असाहयतेवर राजकारण करू नका, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी राज्य सरकार आणि भाजपला दिला.
Breaking News
नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं सुरु आहे'- चंद्रकांत पाटील
वाचा सविस्तर -👉 https://t.co/YajE3MdArQ
@EknathKhadseBJP @ChDadaPatil @BJP4Maharashtra @NCPspeaks— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
'या' देशाने घातली 'सेक्स'वर बंदी; कपल्सला एकमेकांना स्पर्श करण्यास मनाई
वाचा सविस्तर -👉 https://t.co/Jkv5GxyeN9#sex #BorisJohnson #UnitedKingdom #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 20, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”