पंतप्रधान मोदी हे विषारी सापासारखे; काँग्रेस अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप प्रत्यारोपच्या फैली झडत आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ घसरली आहे. मोदी हे हे विषारी सापासारखे आहेत असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. खर्गे यांच्या या विधानानंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे सभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्हाला वाटेल की ते विष आहे की नाही, पण जर तुम्ही त्याचा स्वाद घेतला तर तुम्ही मराल. खर्गे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटल्यानंतर अखेर त्यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी वयक्तिक मोदींबद्दल हे बोललो नाही. भाजपची विचारधारा सापासारखी आहे असं त्यांनी म्हंटल.

खर्गे यांच्या मोदींवरील टीकेनंतर भाजप नेते अमित मालवीय चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी आता पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ म्हटले आहे. सोनिया गांधींच्या ‘मौत का सौदागर’पासून काय सुरू झाले आणि ते कसे संपले हे आपल्याला माहीत आहे. काँग्रेस अजून खालच्या पातळीवर उतरत आहे. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होत आहे आणि हे त्यांना माहीत आहे त्यामुळे ते निराश आहेत असं मालवीय यांनी म्हंटल.