Thursday, March 30, 2023

हुश्श..पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर कायम राहणार, कारण..

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक सोडण्याचा विचार करीत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांनाच धक्का दिला. त्यांनी लिहिले होते, ‘मी या रविवारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर सोशल मीडिया अकाउंट सोडण्याचा विचार करीत आहे’. तथापि, पंतप्रधानांनी त्यांच्या निर्णयामागील काय कारण आहे समजू शकले नसताना आता एक नवीन ट्विट कहाणीत ट्विस्ट घेऊन आलं आहे.

मोदींनी आज सोशल मीडियापासून लांब राहण्यामागचं रहस्यावरून परदा उठवला आहे. येत्या ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स आपण महिलांना हँडल करायला देत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. यावरून पंतप्रधान मोदी केवळ एक दिवस सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबतची माहिती देताना मोदींनी आपल्या ट्विट मध्ये लिहलं आहे, ”या महिला दिनाच्या दिवशी माझी सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करण्याच्या दृष्टीने विचार करतो आहे. महिला या जगाला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेरणा ठरलेल्या महिलांचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आणि त्यासोबत #SheInspiresUs हा हॅशटॅग जोडायचा” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

- Advertisement -

पोस्ट केलेल्या व्हिडीओजमधील निवडक महिलांना नरेंद्र मोदी यांची सोशल मीडिया अकाऊंट्स ऑपरेट करता येणार आहेत. दरम्यान, मोदींच्या या ट्विटनंतर मोदी सोशल मीडियावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यांनतर त्यांच्या समर्थकांसाठी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी सोशल मीडियामध्ये खूप लोकप्रिय आणि सक्रिय आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर पंतप्रधान मोदी ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते आहेत. ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे तब्बल 5 कोटी 33 लाख फॉलोअर्स आहेत. तर दुसरीकडे फेसबुकवर 4 कोटी 4 लाख फॉलोअर्स पंतप्रधान मोदींचे आहेत. इंस्टाग्रामबद्दल बोलायचं झालं तर तेथेही पंतप्रधान मोदींचे 30 कोटी फॉलोअर्स आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.