हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्राचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यामुळे, जर लोकसभा सभापतींनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले तर मोदी सरकारला लोकसभेत बहुमत सिद्ध करावं लागू शकते. त्याच दरम्यान आता मोदींचा २०१८ मधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सरकारवर २०२३ मध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार अशी भविष्यवाणी मोदींनी केल्याचे दिसत आहे.
काय आहे व्हायरल व्हिडिओ मध्ये –
2018 मध्ये, संसदेत तेलुगू देसम पक्षाने मोदी सरकाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि त्याला विरोधी पक्षातील अनेक पक्षांनी पाठिंबा दिला होता. सुमित्रा महाजन या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या ज्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. परंतु त्यावेळी एनडीएला 314 मते मिळाली. आणि सरकारने हा प्रस्ताव बहुमत सिद्ध केलं होते. त्यानंतर मोदींनी भाषणात बोलताना तुम्ही आता 2023 मध्येही अविश्वास प्रस्तावासाठी तयार रहा असा टोला विरोधकांना लगावला होता, त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. मोदींचे तेव्हाचे ते बोल आज खरे ठरले, कारण आज काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीने मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.
2023 मध्ये सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला जाणार हे मोदींनी 2018 मध्येच सांगितलं होतं; Video व्हायरल #Hellomaharashtra pic.twitter.com/aoHk9i6bZe
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 26, 2023
दरम्यान, खासदार गौरव गोगई यांनी लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. तसेच, बीआरएस खासदार नमा नागेश्वर यांनीही केंद्र सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यामुळे जर लोकसभा सभापतींनी निर्देश दिले तर मोदी मोदी सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मणिपुर हिंसाचार आणि अत्याचार प्रकरणावरून मोदींनी बोलावं यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मोदी कोणाचेही ऐकत नाहीत आणि सभागृहात बोलतही नाहीत त्यामुळे सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण हेच योग्य आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हंटल आहे.