भाजपच्या विजयानंतर मोदींचे Tweet; नेमकं काय म्हणाले?

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम ग्राउंड असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपने तब्बल १५० हुन अधिक जागांवर विजय मिळवत २७ वर्षांपासूनची आपली सत्ता कायम राखली. या विजयांनंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गुजरातच्या जनतेचं आभार मानले आहे.

धन्यवाद गुजरात. निवडणुकीचे अभूतपूर्व निकाल पाहून मी खूप भारावून गेलो आहे. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला आणि त्याच वेळी ही गती आणखी वेगाने सुरू राहावी अशी इच्छा व्यक्त केली. मी गुजरातच्या जनशक्तीला नमन करतो असं मोदी म्हणाले. आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे कि, तुमच्यापैकी प्रत्येकजण चॅम्पियन आहे! आपल्या पक्षाची खरी ताकद असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या अपवादात्मक मेहनतीशिवाय हा ऐतिहासिक विजय कधीही शक्य नव्हता असेही मोदींनी म्हंटल.

यावेळी मोदींनी हिमाचल प्रदेशच्या जनतेचंही आभार मानले. हिमाचल प्रदेशातील जनतेने भाजपला दिलेली आपुलकी आणि समर्थनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असं आश्वासनही मोदींनी दिले.

दरम्यान, गुजरात मध्ये तिरंगी लढतीत भाजपने बाजी मारत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा सुफडा साफ केला. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशात मात्र भाजपला हातची सत्ता गमवावी लागली. हिमाचल मध्ये काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला मोठं असं यश मिळालं नाही. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला ५ जागा मिळाल्या तर हिमाचल प्रदेशात त्यांना भोपळाही फोडता आला नाही.