नवी दिल्ली वृत्तसंस्था: राज्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बातचीत केली . राज्यातील कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली आहे
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई करतो आहे असं त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती देखील केली आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत याविषयी देखील पंतप्रधान यांना सांगितले.पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथम पासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्र सरकारने मान्य केल्या याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
PM Narendra Modi today telephoned CM Uddhav Thackeray & said that Maharashtra was fighting a good battle against the second wave. The CM requested that Maharashtra be given more strength in terms of oxygen & informed about various measures: Maharashtra CMO https://t.co/y9Wex2XtRT
— ANI (@ANI) May 8, 2021
कोवीन अँप वरून गोंधळ
लसीकरण करण्यासाठी आधी ऍप वर नोंदणी करणे महत्वाचे असते. या ऍप वर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाची परिस्थिती आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तरी वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यासाठी अडचणी येत आहेत करोना लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या कोविन ऍप यामुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवीन ऍप करण्याची परवानगी मागितली कोवीन ॲप मध्ये अनेक त्रुटी असल्याचे त्यांनी पत्रात लिहिले आहे.