नाशिक मोदींच्या सभेत गडबड होऊ नये म्हणून पोलीस दक्ष

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. पण अनेकजण सध्या सरकार विरुद्ध आंदोलन करत आहेत. त्यामुळं सरकारविरुद्ध आंदोलन  करणाऱ्यांचा पोलिसांनी धसका घेतलाय. मोदींच्या सभेच्या वेळी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी कसली कंबर कसलीये.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून अर्धनग्न आंदोलन करीत असलेल्या अंदरसुल येथील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलय. यावेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केल जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच रणशिंग फुंकल जाणार आहे. दरम्यान, मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील सभेचा परिसर बुधवारीच एनएसजी कंमांडोंनी ताब्यात घेतला असून, संपूर्ण परिसराला छावणीच स्वरूप आले आहे.