हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणाच्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या पोशाखात दिसतात. आता तर NCC च्या कार्यक्रमातील मोदींच्या लूकची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. मोदींच्या या लूकने सर्वांचे लक्ष्य वेधले
दिल्लीच्या करिअप्पा ग्राऊंडवर आज एनसीसीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित एनसीसी कॅडेट्सला मार्गदर्शन केलं. यावेळी मोदींनी गडद हिरव्या रंगाची पगडी डोक्यावर घातली होती. या पगडीवर लाल रंगाचा तुरा होता. एनसीसी कॅडेट्सच्या गडद हिरव्या रंगाच्या कॅपवर देखील अशाच प्रकारचा लाल रंगाचा तुरा असतो. त्यासोबतच पंतप्रधानांनी काळ्या रंगाचा चष्मा घातला होता.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडी ब्रह्म कमळसोबत काळी टोपी घातली होती. या टोपीसोबत कुर्ता पायजमामा आणि मणिपुरी गमछा घातला होता. त्यानंतर आज त्यांनी शीख पगडी घातली होती. आगामी ५ राज्यांच्या निवडणुका समोर असून त्यात पंजाब हेही एक राज्य आहे, त्यामुळे मोदींची पगडीचा संबंध आगामी निवडणुकांशी जोडला जात आहे