हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ममता बॅनर्जी यांच्या हटवादी भूमिकेमुळे पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबाजवणी होऊ शकलेली नाही. ममता बॅनर्जी यांचे धोरण म्हणजे ‘ना काम करेंगे, ना करने देंगे अस म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानातून विधानसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी ते बोलत होते.
ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचा विश्वासघात केला. बंगालमध्ये परिवर्तन होईल, या आशेने जनतेने त्यांना सत्ता दिली. पण तृणमूल काँग्रेसच्या काळात ममता बॅनर्जींनी बंगाल हा काळा बाजार, दलाल आणि सिंडिकेंटच्या हवाली केला, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
बंगालमध्ये होत असलेल्या अत्याचारांमुळे राज्यातील महिलांवर सातत्याने रडण्याची पाळी येत आहे. मात्र, भाजपची सत्ता आल्यास महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’