मोदींनी संवैधानिक शपथ मोडली, तर बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही जबाबदार- असदुद्दीन ओवेसी

0
43
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हैद्राबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम जन्मभूमीवरील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा थाटात संपन्न झाला. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. दरम्यान, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र मोदींच्या या अयोध्या भेटीवर टीका केली आहे.

भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळं राम मंदिराच्या शिलान्यासासाठी हजर राहत मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव असून, हिंदुत्त्वाचा विजय आहे अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘मोदींनी आज भावनिक झाल्याचं म्हटलं. आज मीसुद्धा भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्वास ठेवतो. मी भावनिक झालो आहे, कारण त्या ठिकाणी जवळपास ४५० वर्षांसाठी मशिद उभी होती’, असं ओवेसी म्हणाले. ओवेसी यांनी यावेळी काँग्रेसवरडी खोचक शब्दांत टीका केली. बाबरी मशिद पाडण्यासाठी काँग्रेसही तितकंच जबाबदार आहे, असं म्हणत या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर आधारलेल्या पक्षांचा खरा चेहरा समोर आल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. ओवेसी यांच्या शब्दांतून नाराजी आणि संताप स्पष्टपणे झळकत होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here