हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पश्चिम बंगाल मध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना असून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारात उडी मारली असून ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेतील मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एक मुस्लिम बांधव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काही तरी सांगत असल्याचं या फोटोत पाहायला मिळतंय,ट्विटरवर एका जफर सरेशवाला व्यक्तीनं आपल्या अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला असून, हा फोटो हजार शब्दांच्या किमतीचा असल्याचं त्याने लिहिलंय. पण ती व्यक्ती नेमकं मोदींच्या कानात काय सांगत असेल, याबद्दलही आता सोशल मीडियातून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
This will go as The Image of #BengalElection2021 ! A laa “A Picture is worth a thousand Words” pic.twitter.com/AsxZsuqMwY
— zafar sareshwala 🇮🇳 (@zafarsareshwala) April 3, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दक्षिण 24 परगणामधील सोनारपूर येथे एक जाहीर सभेतून ममता बॅनर्जींवरही जोरदार हल्लाबोल केलाय. ममता बॅनर्जी यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याच्या मुद्द्याला हात घालत मोदींनी ममतांवर पलटवार केलाय. तिकडे तुम्हाला टिळे लावणारे मिळतील. शेंडी ठेवणार भेटतील. इथे तुम्ही जय श्री रामच्या घोषणेनं चिडता. तिथे तुम्हाला हर हर महादेवसुद्धा ऐकायला मिळतील असा टोला मोदींनी लगावला.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page